Prajakta Mali meets Sonali Bendre बालपणीचं 'ते' स्वप्न पूर्ण झालं! २२ वर्षांनंतर प्राजक्ताची थेट सोनाली बेंद्रे भेट, काय घडलं त्या क्षणी?

Prajakta Mali emotional fan girl moment with Sonali Bendre : महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये नुकतीच अभिनेत्री सोनाली बेंद्रेने हजेरी लावली. तेव्हा 22 वर्षांपुर्वीच्या त्यांच्यासोबतच्या खास भेटीचे फोटो शेअर करत प्राजक्ताने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Prajakta Mali emotional fan girl moment with Sonali Bendre
Prajakta Mali emotional fan girl moment with Sonali Bendresaam tv
Published On: 

महाराष्ट्राच्या लाडक्या प्रेक्षकांना खळखळून हसवणारा लोकप्रिय शो म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. या मंचावर अनेक नामांकित कलाकार हजेरी लावत असतात, मात्र नुकताच पार पडलेला भाग खूपच विशेष ठरला. कारण या शोमध्ये बॉलिवूडची सौंदर्यवती आणि लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रेने खास पाहुणी म्हणून हजेरी लावली होती. सोनालीच्या उपस्थितीने संपूर्ण मंचावर एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या बाबतीत एक फॅन मुमेंट घडला. सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीने २००४ मधल्या एका आठवणीला उजाळा देत सोशल मीडियावर सोनाली बेंद्रेसोबतचा जुना आणि आत्ताचा फोटो शेअर केला आहे. २००४ मध्ये प्राजक्ता माळीने ‘क्या मस्ती क्या धूम’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्यावेळी प्राजक्ताला सोनालीच्या हस्ते बक्षीस मिळाले होते. तब्बल इतक्या वर्षांनंतर सोनाली बेंद्रेची पुन्हा खास भेट झाल्याने हा क्षण तिच्यासाठी अतिशय अनमोल होता. या भेटीचा आणि २००४ मधला जुना फोटो शेअर करत तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

prajkta mali and sonali bendre
prajkta mali and sonali bendre saam tv
Prajakta Mali emotional fan girl moment with Sonali Bendre
Famous Actress : "तुला माझ्यासोबत झोपावं लागेल..."; दिग्दर्शकाची प्रसिद्ध अभिनेत्रीकडे घाणेरडी मागणी

एका सामान्य चाहतीपासून ते आज त्याच अभिनेत्रीसोबत एकाच मंचावर सूत्रसंचालक म्हणून उभे राहण्यापर्यंतचा हा प्रवास सांगताना प्राजक्ता भावूक झाली होती. तिने सोनालीप्रती असलेला आपला आदर आणि प्रेम व्यक्त केले. प्राजक्ताचे हे प्रामाणिक शब्द ऐकून सोनाली बेंद्रेही भारावून गेली आणि तिने प्राजक्ताला मिठी मारली.

Prajakta Mali emotional fan girl moment with Sonali Bendre
Famous Actor : काळजाचा ठोकाच चुकला! इमरान हाश्मीचा थरारक अपघात? हवेत पलटी झाली SUV कार अन् थेट...|VIDEO

शोमधील हा अत्यंत गोड, प्रेरणादायी आणि भावनिक क्षण उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला. एका चाहत्याची तिच्या आवडत्या कलाकाराशी झालेली भेट आणि त्यांचा हा प्रवास ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर एका सुवर्णक्षणासारखा ठरला, ज्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com