Elvish Yadav: युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर २५ राउंड गोळीबार; दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडल्या, पोलिसांचा तपास सुरु

Elvish Yadav: प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या घरी गोळीबार झाला आहे. गोळीबारानंतर लगेचच गुरुग्राम पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तेथे पोहोचले आणि तपास सुरू केला.
Elvish Yadav
Elvish YadavSaam Tv
Published On

Elvish Yadav: हरियाणातील गुरुग्राम येथील प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या घरी गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. एल्विश यादवच्या घरावर २५ हून अधिक राउंड गोळीबार करण्यात आला. एल्विश यादवच्या घरी गोळीबार झाला तेव्हा त्यांची आई सुषमा यादव घरीच होत्या. गुरुग्राम येथील पोलीस स्टेशन घटनास्थळी या प्रकरणाचा तपास करत आहे.

कोणतीही धमकी मिळाली नव्हती

एल्विश यादव यांच्या वडिलांनी आज तकला सांगितले की एल्विश घरी नव्हता पण कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. जेव्हा हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि पळून गेले तेव्हा सर्वजण झोपले होते. यानंतर पोलिसांनी येऊन सखोल चौकशी केली. परंतु या गोळीबाराच्या घटनेपूर्वी कुटुंबातील सदस्यांना किंवा एल्विश यांना कोणतीही धमकी मिळाली नव्हती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हल्लेखोर घराच्या गेटबाहेर उभे असल्याचे दिसून येते.

Elvish Yadav
Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

एल्विशच्या घरावरील या हल्ल्याने चाहत्यांना चिंता वाटली आहे. गुरुग्राममधील एल्विश यादवच्या घरावर झालेल्या गोळीबाराने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. अशा घडामोडींमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Elvish Yadav
Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

राहुल फाजिलपुरियाच्या घरावरही हल्ला झाला होता

एल्विशपूर्वी १४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:५० वाजता हरियाणवी आणि बॉलिवूड गायक राहुल फाजिलपुरियावर हल्ला झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात गुन्हेगारांनी गुरुग्राममधील एसपीआर रोडवर ही घटना घडवून आणली. तथापि, नंतर पोलिसांनी अशा कोणत्याही घटनेचा स्पष्टपणे नकार दिला.

Elvish Yadav
Tejswini Pandit: दिलखुलास हसणारी...; आईच्या निधनानंतर लेक तेजस्विनी पंडीतची पहिली भावनिक पोस्ट

गुरुग्राममधील प्रसिद्ध चेहरे

पंजाबी गायक राहुल फाजिलपुरिया हा एल्विश यादवचा जवळचा मित्र आहे. सोशल मीडियावर या हल्ल्यांची जबाबदारी एका गुंडाने घेतली. आणि आता ज्या प्रकारे एल्विस यादवच्या घरावर २५ हून अधिक राउंड गोळीबार करण्यात आला, त्यावरून असे दिसते की हे दोन्ही प्रकार एकमेकांशी जोडले आहेत. पोलिसांचा असा विश्वास आहे की असे हल्ले सहसा गुंडांकडून खंडणी वसूल करण्यासाठी केले जातात त्यातील हा प्रकार असू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com