Rohit Shetty On Shahrukh Khan: 'आम्ही एकमेकांचा...'; दिलवालेमुळे रोहित शेट्टी आणि शाहरुख खानमध्ये कोल्ड वॉर?

Rohit Shetty On Shahrukh Khan Cold War: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये 2015 साली प्रदर्शित झालेल्या 'दिलवाले' चित्रपटाच्या अपयशानंतर शाहरुख खानबद्दल मत व्यक्त केलं आहे.
Rohit Shetty On Shahrukh Khan Cold War
Rohit Shetty On Shahrukh Khan Cold WarSaam Tv
Published On

Rohit Shetty On Shahrukh Khan Cold War: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये 2015 साली प्रदर्शित झालेल्या 'दिलवाले' चित्रपटाच्या अपयशानंतर शाहरुख खान आणि त्याच्या नात्याबद्दल उडालेल्या अफवांवर स्पष्टीकरण दिले. त्यांनी स्पष्ट केले की, या चित्रपटाच्या अपयशामुळे त्यांच्या नात्यात कोणतीही दुरावा निर्माण झाला नाही.​

'दिलवाले' ला देशभरातून फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. हा चित्रपट फ्लॉप ठरला, परंतु रोहित शेट्टीच्या मते, हा चित्रपट आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात यशस्वी झाला. या चित्रपटाच्या अपयशानंतर शाहरुख खान आणि रोहित शेट्टीमध्ये दुरावा आला असून 'दिलवाले'च्या अपयशानंतर दोघांनी पुन्हा कधीही एकत्र काम केले नाही.

Rohit Shetty On Shahrukh Khan Cold War
Shubhangi Atre: 'भाभी जी घर पर हैं' फेम शुभांगी अत्रेच्या घरी पसरली शोककळा; 'या' जिवलगाचा झाला मृत्यू !

मुलाखतीत बोलताना रोहित शेट्टी म्हणाला की, 'नाही, असं काही नाहीये.' आमच्यात कटुता नाही. आमच्यात परस्पर आदर आहे आणि 'दिलवाले' नंतर असे घडले की आम्ही स्वतःचे चित्रपट बनवू लागलो. आम्ही ठरवले की आम्ही स्वतः चित्रपट बनवू आणि जर नुकसान झाले तर ते आमचे स्वतःचे नुकसान असेल आणि यामुळे दुसऱ्या कोणाचे नुकसान होणार नाही.

Rohit Shetty On Shahrukh Khan Cold War
Tiger Shroff Death Threat: जीवे मारण्याची धमकी की पोलिसांची दिशाभूल; अभिनेता टायगर श्रॉफ धमकी प्रकरणात आला नवा ट्विस्ट

या मुलाखतीत रोहित शेट्टीने बॉलिवूडमधील त्यांच्या जवळच्या मित्रांबद्दलही सांगितले. त्याने अजय देवगण, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्याशी त्याचे फार चांगले संबंध असल्याचे स्पष्ट केले. विशेषतः, 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिका पदुकोण गर्भवती असतानाही शूटिंगसाठी उपस्थित राहिल्याचे त्याने कौतुक केले.​

'दिलवाले' चित्रपटाच्या अपयशानंतर रोहित शेट्टी आणि शाहरुख खान यांनी एकत्र काम केले नाही, परंतु रोहित शेट्टीने स्पष्ट केले की, भविष्यात योग्य स्क्रिप्ट मिळाल्यास ते पुन्हा एकत्र काम करण्यास तयार आहेत. रोहित म्हणाला, "जर काही चांगली कथा मिळाली, तर आम्ही नक्कीच एकत्र काम करू."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com