Diljit Dosanjh: 'बन गईं रील्स, हो गई डिबेट...'; दिल्ली कॉन्सर्टला परवानगी मिळताच दिलजीत दोसांझचा टोला

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या दिल्ली कॉन्सर्टला परवानगी मिळाल्यानंतर गायकाने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. ‘बन गईं रील्स, हो गई डिबेट’ म्हणत त्याने चर्चांना मिश्कील टोला लगावला.
Diljit Dosanjh
Diljit DosanjhSaam Tv
Published On: 

Diljit Dosanjh: पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या दिल्लीतील आगामी कॉन्सर्टची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. सुरक्षेच्या कारणामुळे कॉन्सर्ट रद्द होणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र, आयोजक आणि पोलिसांमधील चर्चेनंतर कार्यक्रमाला परवानगी मिळाल्याची माहिती समोर आली. यानंतर दिलजीतने सोशल मीडियावर लाइव्ह येत या संपूर्ण प्रकरणावर मिश्कील अंदाजात प्रतिक्रिया दिली.

३० ऑक्टोबरला दिल्लीत रंगणार दिलजीतचा कॉन्सर्ट

दिलजीत दोसांझचा ३० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये कॉन्सर्ट होणार आहे. हा कार्यक्रम त्याच्या ‘ऑरा इंडिया टूर’चा भाग आहे. या कॉन्सर्टसाठी चाहते उत्सुक आहेत. पण, सुरक्षेच्या कारणामुळे परवानगी मिळण्याबाबत अडचणी निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे कार्यक्रम होणार की नाही, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आयोजक आणि दिल्ली पोलिसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर लोकांच्या सुरक्षेबाबत सर्व अटी मान्य करण्यात आल्या आणि कॉन्सर्टला परवानगी मिळाल्याचे वृत्त आहे.

Diljit Dosanjh
Saif Ali Khan: सैफ अली खान विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; ४ कोटींपेक्षा जास्त झाला फायदा

‘बन गईं रील्स, हो गई डिबेट…’, दिलजीतचा टोला

कॉन्सर्टला परवानगी मिळाल्यानंतर दिलजीतने इन्स्टाग्राम लाइव्ह येत या प्रकरणावर भाष्य केले. यावेळी त्याने सोशल मीडियावर सुरू झालेल्या चर्चांवर मिश्कील प्रतिक्रिया दिली. दिलजीत म्हणाला, 'बन गईं रील्स, बन गए ट्वीट्स, हो गई आपके न्यूज़रूम की डिबेट्स. अब मिलते हैं ३० तारीख को दिल्ली में.' त्याच्या या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एखाद्या बातमीची पूर्ण माहिती समोर येण्यापूर्वीच त्यावर रील्स बनवणे, ट्वीट करणे आणि चर्चासत्रे आयोजित करणे यावर त्याने अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Diljit Dosanjh
Celebrity Bomb Threat: अमिताभ बच्चन यांचे घर आणि दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबईत धमकीच्या ई-मेलने खळबळ

कॉन्सर्टसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. वाहतूक नियंत्रण, पार्किंग, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग यांसारख्या गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती आहे.

दिलजीत दोसांजचा भारत दौरा कोणत्या शहरांत होणार?

इंदूर: १५ नोव्हेंबर २०२६

अहमदाबाद: २१ नोव्हेंबर २०२६

मुंबई: २७ नोव्हेंबर २०२६

बेंगळुरू: २९ नोव्हेंबर २०२६

लखनौ: ५ डिसेंबर २०२६

याशिवाय चंदीगडमध्येही दिलजीतचा कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com