'कोल्ड प्ले' हा जगातील नावाजलेला बँड आहे. पुढील वर्षी 2025 मध्ये नवी मुंबईत याचा एक मोठा कार्यक्रम होणार आहे. परंतु हा कॉन्सर्ट तिकीटांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार झाल्याचे समोर आले आहे. यावरून उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली असून तिकिटांचा काळाबाजार रोखण्यीच मागणी केलीय.
कॉन्सर्ट तिकीटांच्या प्रकरणी अद्यापही ब्लॅकची विक्री थांबली नसून ही विक्री सुरूच आहे. न्यायालयाने ही याचिकेवर दिवाळीच्या सुट्टीनंतर सुनावणी ठेवली.तसेच याप्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. पंजाबचा प्रसिद्ध गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ यामध्ये आपल्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर जादू करणार आहे. दिलजीत दोसांझच्या चाहत्यांची तिकिटासाठी चांगली चढाओढ पाहायला मिळत आहे.
कोल्ड प्ले आणि दिलजित कन्सर्टच्या (Diljit Dosanjh concert) तिकिटांच्या काळाबाजारी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)धाड टाकली आहे. ईडीने एकूण 13 ठिकाणी छापे टाकले आहेत. मुंबई, दिल्ली, जयपूर , चंदीगढ आणि बेंगळुरू येथे ईडीने धाड टाकण्याची कारवाई केलीय. या प्रकरणी तिकिटांच्या काळाबाजारासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आलाय.
'कोल्ड प्ले' या कार्यक्रमाची तिकिटे गेल्या महिन्यात 'बुक माय शो' वर उपलब्ध होती. अवघ्या काही मिनिटांत या तिकिटांची ऑनलाईन विक्री करण्यात आली. ही तिकिटे चाहत्यांना ३ लाख रुपयांना पडली. दिलजीत दोसांझच्या गाण्याचे चाहते दिवाने आहेत. त्याच्या प्रत्येक कॉनस्टला खूप गर्दी पाहायला मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.