Dia Mirza: फवाद खानच्या कमबॅकला पाठिंबा; दिया मिर्झाने मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाली-चुकीचा अर्थ काढणं...

Dia Mirza on Support of Fawad Khan: बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिने पाकिस्तानचा लोकप्रिय अभिनेता फवाद खानच्या बॉलिवूडमध्ये पुनरागमनाबाबत स्वतःचे मत स्पष्ट केले आहे.
Dia Mirza on Support of  Fawad Khan
Dia Mirza on Support of Fawad KhanSaam Tv
Published On

Dia Mirza on Support of Fawad Khan: बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिने पाकिस्तानचा लोकप्रिय अभिनेता फवाद खानच्या बॉलिवूडमध्ये पुनरागमनाबाबत स्वतःचे मत स्पष्ट केले आहे. अलीकडेच तिच्या एका मुलाखतीनंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली होती की दिया मिर्झा फवाद खानला बॉलिवूडमध्ये पुन्हा पाहण्याची इच्छा आहे. मात्र आता तिने या चर्चांवर स्पष्ट भूमिका घेत, अफवा आणि चुकीच्या अर्थाने बातम्या पासलवाल्या जात असल्याचे म्हटले आहे.

दिया मिर्झाने स्पष्ट केलं की तिने कोणतीही मोहीम चालवली नव्हती किंवा फवाद खानच्या पुनरागमनासाठी खास काही प्रयत्न केले नव्हते. तिने सांगितले, “मी एका मुलाखतीत फक्त इतकंच म्हटलं होतं की, फवाद एक उत्तम अभिनेता आहे आणि त्याला पुन्हा हिंदी चित्रपटसृष्टीत पाहणं आनंददायक ठरेल. पण याचा अर्थ मी कोणतीही मागणी केली असा नाही.” तिच्या या विधानाने तिने सोशल मीडियावर पसरवलेल्या चुकीच्या अर्थाला सडेतोड उत्तर दिलं.

Dia Mirza on Support of  Fawad Khan
Karan Veer Mehra: बांट दिया इस धरती को...; पहलगाम हल्ल्यावरील 'बिग बॉस फेम करण वीर मेहराच्या कवितेने चाहत्यांच्या डोळ्यात पाणी

फवाद खानने "खूबसूरत", "कपूर अँड सन्स", "ऐ दिल है मुश्किल" सारख्या चित्रपटांतून भारतीय प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं. मात्र, भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावानंतर पाकिस्तानी कलाकारांवर निर्बंध लावण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर फवाद खान परत कधी बॉलिवूडमध्ये दिसणार, याबद्दल चर्चा सुरू होती. दिया मिर्झाच्या प्रतिक्रियेमुळे ही चर्चा अधिक गतीने पसरली, पण तिने स्वतः शोषलं मीडियावर एक पोस्ट करत गैरसमज दूर केले.

Dia Mirza on Support of  Fawad Khan
Munawar Faruqui: खुदा माफ नहीं...; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर मुनव्वर फारूकी शायरीतून व्यक्त, बोचक शब्दात नेमकं काय म्हणाला? पाहा पोस्ट

दिया मिर्झा म्हणाली की तिचे शब्द चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. तिने लिहिले, “मी फक्त एक कलाकार म्हणून त्याच्या अभिनयाचा आदर केला. पण याचा कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक आंदोलनाशी काही संबंध नाही,” "माध्यमांच्या सदस्यांनो, माझ्या बोलण्याचे चुकीचे वर्णन करणे थांबवा. १० एप्रिल रोजी माझ्या एका चित्रपटासाठी मुलाखत घेतली होती, ज्यामध्ये मी या भयानक दहशतवादी हल्ल्याच्या खूप आधी एक कोट दिला होता. माझे कोट आताच प्रसारित करत त्याचा चुकीचा अर्थ काढणं थांबवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com