Dharmendra Health Update : धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त खोटं, हेमा मालिनी अफवांवर भडकल्या

Dharmendra Health Update: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. मात्र, इशा देओल हिने स्पष्ट केलं आहे की धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. धर्मेंद्र मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
Dharmendra
DharmendraSAAM TV
Published On

Esha deol on Dharmendra Health Update : बॉलिवूडचा ही मॅन अर्थात धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी सोमवारी रात्रीपासून व्हायरल होत आहे. सोमवारी सकाळीही धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीने सोशल मीडियावर शोककळा पसरली होती. प्रत्येकजण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत होती. पण धर्मेंद्र यांच्या निधन आणि प्रकृतीबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे. दरम्यान धर्मेंद्र यांची मुलगी इशा देओल हिने इन्स्टावर पोस्ट करून महत्त्वाची माहिती दिली आहे. Dharmendra health update today by Esha Deol

सोमवारी अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी अचानक सोशल मीडिया आणि अनेक वृत्त माध्यमांनी धर्मेंद्र यांचे निधन झाल्याच्या बातम्या दिल्या. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक ज्येष्ठ अभिनेत्यांनी , राजकीय नेत्यांनीही यावर शोक व्यक्त केला. मात्र, त्यानंतर काहीवेळातच धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले.

Dharmendra
Delhi Car Blast : ब्लास्टच्या आधीचे CCTV फुटेज समोर, दहशतवादी डॉक्टर उमर झाला स्पॉट, काळ्या मास्कने....

इशा देओलने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले?

माध्यमांतून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. माझे वडील धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे. आपल्या कुटुंबाची प्रायव्हेसी जपावी. वडिलांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी तुमच्या प्रार्थनेसाठी धन्यवाद.

जे घडत आहे ते अक्षम्य आहे! जबाबदार चॅनेल्सने खोट्या आणि चुकीच्या बातम्या देऊ नये. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेच्या गरजेचा योग्य आदर करा.

धर्मेंद्र यांच्याबद्दल...

धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 मध्ये पंजाबमधल्या कपूरथला जिल्ह्यात झाला होता. त्यांचं शिक्षण फगवाडा इथल्या आर्य हायस्कूलमध्ये झालं. धर्मेंद्रंचं शिक्षण हे मॅट्रिकपर्यंत झालं होतं. त्यानंतर ते रेल्वेमध्ये क्लर्क म्हणून नोकरीलाही लागले. पण सिनेमाची,अभिनयाची आवड असल्यानं त्यांनी ती नोकरी सोडली. त्यांनी फिल्मफेअरच्या स्पर्धेत भाग घेतला अन् त्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं. १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांच्या ‘फूल और पत्थर’, ‘यादों की बारात’, ‘मेरा गाँव मेरा देश’, ‘नौकर बिवी का’, ‘बेताब’, ‘घायल’ यांसारख्या अनेक चित्रपटांनी हिंदी सिनेमाला नवे आयाम दिले. २०१२ मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com