Trance of Kuberaa Teaser: एका गरीब मुलगा बदलणार भविष्य; धनुषच्या 'ट्रान्स ऑफ कुबेरा' चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित

Trance of Kuberaa Teaser: राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शेखर कम्मुला यांच्या आगामी 'ट्रान्स ऑफ कुबेरा' या सामाजिक थ्रिलर चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
Trance of Kuberaa Teaser
Trance of Kuberaa TeaserSaam Tv
Published On

Trance of Kuberaa Teaser:  राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शेखर कम्मुला यांच्या आगामी 'ट्रान्स ऑफ कुबेरा' या सामाजिक थ्रिलर चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या दोन मिनिटांच्या टीझरमध्ये धनुष, नागार्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या पात्रांची झलक पाहायला मिळते, ज्यात लोभ, सत्ता आणि नैतिकतेच्या संघर्षाचे चित्रण आहे.

टीझरमध्ये धनुष एका गरीब व्यक्तीच्या भूमिकेत दिसतो, जो सत्तेच्या विरोधात बंड पुकारतो. त्याचे पात्र एका गूढ प्रवासावर आधारित आहे. नागार्जुन एका विरोधाभासी पात्रात दिसतो, जो संकटात सापडलेला आहे. रश्मिका मंदान्ना एका मध्यमवर्गीय स्त्रीच्या भूमिकेत आहे, जिला तिच्या आयुष्यात अधिक काही हवे आहे. जिम सर्भ एका यशस्वी व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसतो, ज्याचे पात्र महत्त्वपूर्ण वाटते.

Trance of Kuberaa Teaser
Actor Passes Away: १०० हून अधिक चित्रपटात काम करणारे प्रसिद्ध अभिनेते काळाच्या पडद्याआड; मूळ गावी घेतला अखेरचा श्वास

चित्रपटाचे संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले असून, टीझरमध्ये 'मेरी मेरी मेरी ये दुनिया सारी' हे गीत ऐकायला मिळते, ज्याचे बोल रकीब आलम यांनी लिहिले आहेत आणि हेमचंद्र वेदाला यांनी गायले आहे. 'ट्रान्स ऑफ कुबेरा' हा चित्रपट २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Trance of Kuberaa Teaser
Reem Shaikh: रीम शेख पुन्हा जखमी; 'लाफ्टर शेफ्स 2' च्या सेटवर आणखी एक मोठा अपघात

या चित्रपटात धनुष, नागार्जुन, रश्मिका मंदान्ना, जिम सर्भ आणि दलीप ताहिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती शेखर कम्मुला, सुनील नारंग आणि पुस्कुर राम मोहन राव यांनी केली आहे. चित्रपटाचे छायांकन निकेत बोम्मिरेड्डी यांनी केले असून, संपादन कार्तिका श्रीनिवास यांनी केले आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा शेखर कम्मुला आणि चैतन्य पिंगली यांनी लिहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com