Dhamaal 4: अजय देवदान, रितेश देशमुख, अर्शद वारसी पुन्हा येणार 'धमाल' करायला; या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

Dhamaal 4 Movie: अजय देवगण आणि रितेश देशमुख स्टारर 'धमाल-४' या चित्रपटाची रिलीज डेट वेगळ्या शैलीत जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटात मोठ्या कलाकारांची फौज दिसणार आहे.
Dhamaal 4
Dhamaal 4Saam TV
Published On

Dhamaal 4 Movie: अजय देवगण, रितेश देशमुख स्टारर 'धमाल-४' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वांनाच उत्सुकता आहे. सोशल मीडियावर या विनोदी चित्रपटाशी संबंधित एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे आणि लवकरच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. अलीकडेच या चित्रपटातील कलाकारांचा फोटो समोर आला होते, यामध्ये अनेक नवीन कलाकारांची ओळख करुन दिली आणि आता या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहिर करण्यात आली आहे.

अजय देवगणने इंस्टाग्रामवर एका मजेदार पोस्टद्वारे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. त्याने एका वर्तमानपत्राच्या कटिंगमध्ये छापलेला स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, यावर 'धमाल टाईम्स' आणि 'ब्रेकिंग न्यूज' लिहिलेले आहे. त्यात १० कलाकारांचे फोटो आहेत. तसेच कॅप्शन दिले आहे की, 'आजची ताजी बातमी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, ती टोळी जी आता लवकरच तुमचे मन लुटण्यासाठी येत आहे. 'धमाल ४' २०२६ च्या ईदला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.'

Dhamaal 4
Kapil Show: मी माझ्या बायको आणि गर्लफ्रेंडसोबत...; कपिल शर्माच्या शोमध्ये आलेल्या पाहुण्यामुळे संजय दत्त आणि सुनील शेट्टी आवाक

'धमाल ४' ची रिलीज डेट

टी-सीरीजनेही त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट पोस्ट केली आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'या स्वाइपने तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पोहोचू शकता. बातमी अशी आहे की, 'धमाल ४' चे शूटिंग पूर्ण झाले आहे. आता धमालची मजा सुरू होईल! २०२६ च्या ईदमध्ये भेटू!'

Dhamaal 4
Salman Khan: सलमान खानच्या डोळ्यात आलं पाणी; बिग बॉसमधील या स्पर्धकाची कहाणी ऐकून झाला भावुक

'धमाल ४' मधील कलाकार

यासोबतच, ईशा गुप्ता, अर्शद वारसी, रितेश देशमुख आणि इतर कलाकारांनीही त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले आहेत. या चित्रपटात अजय देवगणसह संजय मिश्रा, ईशा गुप्ता, संजीदा शेख, अंजली आनंद, उपेंद्र लिमये, विजय पाटकर आणि रवी किशन सारखे उत्तम कलाकार आहेत. इंद्र कुमार दिग्दर्शित, हा चित्रपट टी-सीरीज, देवगण फिल्म्स, मारुती इंटरनॅशनल आणि पॅनोरमा स्टुडिओजच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे आणि अजय देवगण, भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठाकेरिया, इंद्र कुमार, आनंद पंडित आणि कुमार मंगत पाठक यांनी निर्मिती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com