Breaking : "मिर्झापूर' वेब सिरीजमधील 'ललित'चा मृत्यू; बाथरूमध्ये आढळला मृतदेह

Mirzapur या बहूचर्चित बेव सिरिजमध्ये (Web series) मुन्नाभैयाचा खास मित्र म्हणून भुमिका पार पाडणाऱ्या ललित म्हणजेच Actor ब्रह्म मिश्रा यांचे निधन झाले आहे.
 ब्रह्म मिश्रा
ब्रह्म मिश्रा SaamTV
Published On

मुंबई : मिर्झापूर (Mirzapur) या बहूचर्चित बेव सिरिजमध्ये (Web series) मुन्नाभैयाचा खास मित्र म्हणून भुमिका पार पाडणाऱ्या ललित म्हणजेच अभिनेता ब्रह्म मिश्रा (Actor Brahma Mishra) यांचे निधन झाले आहे. अभिनेता मिश्रा यांनी अनेक हिंदी सिनेमा आणि वेबसिरिज मध्ये कामं केली आहेत.

हे देखील पहा -

मांझी मध्ये पहाडी माणूस म्हणून तसेच केसरी (Kesari) या अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. अभिनेता ब्रह्म मिश्रा वर्सोव्यातील यारीरोड परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत ते रहात होते. राहत्या फ्लॅटमधील बाथरूमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. मिश्रा याच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी खोलीचे दार उघडून पाहिले असता. बाथरूममधून ही दुर्गंधी येत होती.

 ब्रह्म मिश्रा
किरण गोसावीच्या अडचणींमध्ये वाढ; 'त्या' जुन्या प्रकरणाचा झाला उलगडा

मिश्रा हे बाथरूमला गेले असताना त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह पाठवण्यात आला असून वर्सोवा पोलिसांनी अपमृत्यूच नोंद करत, अधिक तपास पोलिस करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com