Janhvi Kapoor: दहीहंडीदरम्यान जान्हवी कपूरसोबत धक्काबुक्की; 'भारत माता की जय' म्हणत अभिनेत्रीने फोडली मटकी

Janhvi Kapoor: जन्माष्टमीच्या दिवशी मुंबईत दहीहंडीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. गोविंदा, जितेंद्र, जया प्रदा आणि जान्हवी कपूर सारख्या स्टार्सनी या उत्सवात भाग घेतला होता.
Janhvi Kapoor
Janhvi KapoorSaam Tv
Published On

Janhvi Kapoor: काल दहीहंडी हा सण मुंबईसह संपूर्ण भारतासह मुंबईतही साजरा झाला. मुंबईत दादर, ठाणे, बोरिवली, घाटकोपर येथे मानाच्या हंड्या फोडल्या या दहीहंडीसाठी अनेक कलाकार सहभागी झाले होते. यामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरने देखील सहभाग घेतला होता. पण या दहीहंडीत तिच्यासोबत धक्काबुक्कीचा प्रकार घडला असून याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

'परम सुंदरी' अभिनेत्री जान्हवी कपूर देखील दहीहंडी उत्सवात सहभागी झाली होती आणि ती हंडी फोडताना दिसली. हंडी फोडताना जान्हवीने 'भारत माता की जय'चा जयघोष केला. मुंबईतील घाटकोपरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते, त्यापैकी एका व्हिडिओमध्ये ती मराठी बोलताना आणि चाहत्यांना चित्रपट पाहण्याचे आवाहन करताना दिसत आहे. तथापि, जेव्हा ती कार्यक्रमातून बाहेर पडू लागली तेव्हा ती लोकांच्या गर्दीमुळे तिच्यावर धक्काबुक्की झाली. ती गाडीजवळ पोहोचत असताना तिच्या अंगरक्षकाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला अनेक वेळा ढकलण्यात आले, ज्यामुळे ती अस्वस्थ दिसत होती.

Janhvi Kapoor
Elvish Yadav: युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर २५ राउंड गोळीबार; दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडल्या, पोलिसांचा तपास सुरु

दहीहंडी उत्सवाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये जितेंद्र आणि जया प्रदा 'तकी ओ तकी' या प्रसिद्ध गाण्यावर नाचताना दिसत आहेत. कलाकारांव्यतिरिक्त, या गाण्यात श्रीदेवी देखील होत्या. पण आता त्या नसल्यामुळे जितेंद्र आणि जया प्रदा यांनी या गाण्यावर नाचत चाहत्यांना खूश केले.

Janhvi Kapoor
Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

संजय दत्तने हंडी फोडली, गोविंदा देखील गाण्यावर थिरकला

संजय दत्तनेही लोकांमध्ये हंडी फोडली आणि गोविंदाही आशीर्वाद घेण्यासाठी इस्कॉन मंदिरात गेला. यानंतर तो दहीहंडी कार्यक्रमात पोहोचला, जिथे तो 'सोना कितना सोना है' या गाण्यावर काळ्या कपड्यांमध्ये स्टेजवर नाचताना दिसला. यादरम्यान शरद केळकर देखील स्टेजवर उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com