झारखंड : सतत वादात सापडणारी बॉलिवूडची (Bollywood) एन्टरटेन्मेंट क्वीन अभिनेत्री राखी सावंत (Controversy Queen Rakhi Sawant) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी पुन्हा तिच्या कारनाम्यांमुळे अडचणीत आली आहे. सगळ्यांनाच माहीत आहे की राखी तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. यावेळी राखी सावंत तिच्या याच मनोरंजनामुळे अडचणीत आली असून राखी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (FIR on Rakhi Sawant) तसेच सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून ती प्रचंड ट्रोल होऊ लागली आहे. (FIR filed Against Rakhi Sawant)
हे देखील पहा :
रांचीच्या एसटी-एससी पोलिस ठाण्यात राखीविरोधात हा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. नुकताच या राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे (Rakhi Sawant Viral Video). याच व्हिडिओमुळे झारखंडच्या केंद्रीय सरना समितीने राखी सावंतविरोधात तक्रार दाखल केली आहे.
राखीने करमणुकीच्या नावाखाली केली आदिवासींची चेष्टा
राखी सावंत नेहमीच तिच्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर स्वतःचे मजेदार व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत असते. पण यावेळी मनोरंजनाच्या कल्पनेने राखीवर पडदा पडला. लोकांचे मनोरंजन करण्याच्या नादात राखीने अनेक वेळा मर्यादा ओलांडल्या आणि परिणामी तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. तिच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये राखी सावंत आदिवासींची (Aadivasi) चेष्टा करताना दिसली. या व्हिडिओमध्ये तिचा लूक आणि कपडे पाहून ती स्वत:ला आदिवासी म्हणवताना दिसत आहे. यामुळेच त्यांनी संपूर्ण आदिवासी समाजाची चेष्टा करून त्यांचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
राखी सावंत पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल
राखी सावंतने तिच्या कपड्यांना आदिवासींचे कपडे असे सांगून अश्लीलतेची हद्द ओलांडल्याचा आरोप सरना समितीने केला आहे. या कृत्यांमुळे ती सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावरही आली आहे. ट्रोलर्सकडून राखीला जोरदार ट्रोल करण्यात आले आहे. दरम्यान, हा वादग्रस्त व्हिडीओ राखी सावंतने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हटवला आहे.
Edited By : Krushnarav Sathe