स्वत:च्या मुलीचा पहिला नंबर यावा म्हणून नेत्याने टॉपरला शाळेतून काढलं; मुलीची आत्महत्या

आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दहावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे.
Andra Pradesh
Andra Pradesh Saam TV
Published On

चित्तूर: आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दहावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी मुलीने आपल्या आई-वडिलांसाठी एक चिठ्ठा लिहीली आहे. तिनं आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली ते कारण चिठ्ठीत नमुद केले आहे. चित्तूरच्या पालमनेरमध्ये राहत असलेल्या मिस्बाह फातिमाचे वडील सोडा विकून आपल घर चालवतात. फातिमा गंगावरम इथल्या ब्रह्मर्षी शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती.

फातिमानं आत्महत्येपूर्वी आपल्या आई वडिलांसाठी एक चिठ्ठी लिहून त्यांची माफी मागितली आहे. आपली मुलगी प्रथम यावी म्हणून एका मुलीच्या वडीलांनी शाळा प्रशासनावर दबाव टाकून मला शाळेतून काढून टाकले आहे, असे कारण आत्महत्या केलेल्या मुलीने लिहून ठेवले आहे. चिठ्ठीत पुढे लिहीले आहे की शाळेच्या मुख्याध्यापकांनी कुठलंही कारण न देता मला शाळेतून काढून टाकले आहे.

Andra Pradesh
चेन्नईला दुसरा मोठा धक्का, मिल्ने संघातून बाहेर 'लिटील मलिंगा' संघात दाखल

फातिमाच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस अतिशय धीम्या गतीनं तपास करत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. आरोप सत्ताधारी पक्षाचा नेता असल्यानं त्याला पाठिशी घालत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तेलगु देसम पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा लोकेश यांनी मिस्बाह फातिमाच्या आत्महत्येसाठी वायएसआर काँग्रेसच्या नेत्याला जबाबदार धरलं आहे.

मिस्बाहला वायएसआर काँग्रेसचे नेते सुनील यांच्या मुलीपेक्षा अधिक गुण मिळाले होते. त्यामुळे मिस्बाहला त्रास दिला जात होता. तिला सातत्यानं धमक्या दिल्या जात होत्या. खुद्द मुख्याध्यापकच तिला धमकावत होते. त्यामुळे मिस्बाहनं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप लोकेश यांनी केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com