Coolie Public Review: लोकेश कनागराज यांचा 'कुली' चित्रपट ज्यामध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत आहेत आणि नागार्जुन, सौबिन शाहीर, सत्यराज, उपेंद्र, श्रुती हासन आणि आमिर खान यांच्यासारख्या कलाकारांचा समावेश आहे, १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रेक्षक थलाईवाच्या कामाचे कौतुक करत आहेत. तर चित्रपटाबद्दल समिश्र प्रतिक्रिया देत आहेत.
रजनीकांतकडून चाहत्यांसाठी भेट
अनेक चाहत्यांनी कुलीला रजनीकांत यांच्या कडून चाहत्यांसाठीची भेट असे म्हटले आहे. एका उत्साही प्रेक्षकांनी लिहिले, "कुली उत्तम आहे. आतापर्यंतचा सर्वात मनोरंजक #थलाईवा चित्रपट. दर ५ मिनिटांनी गियर बदलतो आणि दर १० मिनिटांनी एक ट्विस्ट. थलाईवाकडून मिळालेली ही सर्वोत्तम भेट... यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही.
नागार्जुनने साकारलेल्या सायमनच्या भूमिकेचे काहींनी कौतुक केले, कुलीमधील नागार्जुनसाठी कौतुकास्पद पोस्टमध्ये लिहीले, 'मी खेळ खेळत नाही... मी नियम बदलतो... तो प्रत्येक फ्रेममध्ये उत्तम काम खलनायक असावा तर असा. पण काही प्रेक्षकांना चित्रपटाची कथा अवडली नाही एका प्रेक्षकाने म्हटले, क्लायमॅक्स चांगला नव्हता आणखी चांगला क्लायमॅक्स आणि कथा आणखी रंगवता आली असती.
तर, आमिर खानच्या कॅमिओला वर्षातील सर्वोत्तम कॅमिओ म्हटले आहे आणि लिहिले आहे की कथा थोडी चांगली असू शकली असती, परंतु रजनीकांत यांनी संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर घेतला आहे. नागार्जुनच्या खलनायकाच्या भूमिकेला चित्रपटाचा कणा म्हटले जात आहे. दक्षिण डिजिटल मीडियाने संपूर्ण भारतातील कलाकारांचे आणि अनेक स्टार्सच्या दमदार पुनरागमनाचे कौतुक केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.