Bhuvan Bam FIR: प्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम विरोधात गुन्हा दाखल! युनिव्हर्सिटीतील कॉमेडी शोमध्ये अश्लील वक्तव्य करणं भोवलं

Bhuvan Bam FIR: लोकप्रिय युट्यूबर भुवन बामविरोधात गुजरातमध्ये एफआयआर दाखल झाला आहे. पारुल युनिव्हर्सिटीतील कॉमेडी शोचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कथित आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे पोलिसांनी कारवाई केली आहे.
Bhuvan Bam FIR
Bhuvan Bam FIRSaam Tv
Published On: 

Bhuvan Bam FIR: लोकप्रिय युट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम सध्या वादात अडकला आहे. गुजरातमधील पारुल युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित कॉमेडी शोमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

२५ नोव्हेंबर रोजी वडोदरा येथील पारुल युनिव्हर्सिटीमध्ये 'द लॉरी शो' या कॉमेडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'द कॉमेडी फॅक्टरी' या ग्रुपने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये भुवन बामसह मनन देसाई, चिराग मिस्त्री, दीप वैद्य आणि संजीदा शेख हे कलाकार सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला विद्यापीठातील अनेक विद्यार्थीही उपस्थित होते.

Bhuvan Bam FIR
Bigg Boss 20: बिग बॉस २०मध्ये सलमान खानचा चढला पारा! स्काउट आणि गुल्लूला सुनावले खडेबोल, लव्ह गिलला अश्रू अनावर

व्हिडीओमध्ये काय दिसलं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिला मंचावर भुवन बामशी बोलताना दिसते. यावेळी ती म्हणते की, कधीकधी एखाद्या गाडीखाली यावेसे वाटते, म्हणजे दोन-तीन महिने कोणीही त्रास देणार नाही. यावर भुवनने आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. तसेच त्याने बाथरूमशी संबंधित विनोद करताना स्वतःच्या 'टिटू मामा' या पात्राचाही उल्लेख केला. यावेळी त्याने काही आक्षेपार्ह हावभाव केल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

Bhuvan Bam FIR
Actor Viral Photo: प्रसिद्ध अभिनेत्याचे गर्लफ्रेंडसोबतचे खासगी फोटो व्हायरल! संतापून म्हणाला, 'मी त्याला ठार मारेन'

विद्यापीठाच्या सुरक्षा प्रमुखांची तक्रार

या प्रकरणी पारुल युनिव्हर्सिटीचे सुरक्षा प्रमुख महेंद्र प्रताप सिंह यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. कार्यक्रमाला परवानगी देताना आयोजकांना सभ्य आणि स्वच्छ विनोद सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कार्यक्रमामुळे विद्यापीठाची प्रतिष्ठा खराब होऊ नये, असेही सांगण्यात आले होते.

विद्यापीठानेही घेतली भूमिका

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमात अशा प्रकारची वक्तव्य केली जातील, याची आपल्याला आधी माहिती नव्हती आणि त्यासाठी परवानगीही दिली नव्हती, असे विद्यापीठाने स्पष्ट केले. त्यानंतर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, वडोदरा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुशील अग्रवाल यांनीही भुवन बामविरोधात एफआयआर दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.