Indrayani : इंद्रायणीची घोषणा! दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होणार शाळेची पायाभरणी, कोण असणार खास व्यक्ती?

Indrayani Marathi Serial Update :'इंद्रायणी'चे शाळा उभारण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शाळेची पायाभरणी होणार आहे. ज्यासाठी एक खास व्यक्ती येणार आहे.
Indrayani Marathi Serial Update
IndrayaniSAAM TV
Published On
Summary

'इंद्रायणी' मालिकेत दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शाळेची पायाभरणी होणार आहे.

'इंद्रायणी' मालिका कलर्स मराठीवर 7 वाजता पाहायला मिळते.

इंद्रायणीचे शाळा उभारणीचे स्वप्न लवकरच पूर्ण होताना दिसत आहे.

कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' (Indrayani ) मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला मिळत आहे. विठूच्या वाडीतील राजकारणाचा पट आता अधिक रंगतदार बनला आहे. गावाच्या विकासाचा आणि शिक्षणाच्या नव्या पर्वाचा मुद्दवरून गावात डॉक्टर गोपाळ दिग्रसकर आणि अधोक्षज महाराज दिग्रसकर यांच्यात वाद होतो. गावातील मंडपात जमलेल्या ग्रामस्थांसमोर मोहितराव बोडके यांच्या सूत्रसंचालनाखाली दोन्ही भावांमधील हा 'विचारांचा संघर्ष' पाहायला लोक उत्साहाने जमले होते.

विज्ञान, आधुनिक विकास आणि ज्ञानाचा पुरस्कार करणारा डॉक्टर गोपाळ तर परंपरा, संस्कार आणि माणुसकीचा पुरस्कार करणारा अधोक्षज या दोन विचारसरणींची थेट टक्कर सर्वांसमोर होणार आहे. गावाच्या विकासावरून गोपाळ-अधोक्षज यांच्यात वैचारिक टक्कर बघायला मिळणार आहे. अधोक्षजचे म्हणणे आहे की, "मातीशी निष्ठा जोडली तरच प्रगती होईल" तर मोहितराव सूड भावनेने इशारा देताना दिसणार आहे. तो म्हणतो, "ही शाळा उभी राहू देणार नाही!" ह्या वादाने गावाचा राजकीय तापमान वाढले आहे.

'इंद्रायणी' मालिकेत इंद्रायणी जाहीर करते की, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शाळेची पहिली विट ठेवली जाणार आहे. ही विट एका खास व्यक्तीकडून ठेवली जाणार आहे. 'ती खास व्यक्ती कोण असणार?' हा प्रश्न आता गावभर चर्चेचा विषय ठरला आहे. 'इंद्रायणी' च्या येणार भागांमध्येच खास व्यक्तीचा चेहरा सर्वांसमोर येणार आहे. 'इंद्रायणी' मालिका कलर्स मराठीवर संध्याकाळी 7.00 वाजता पाहायला मिळते.

गोपाळने विकासाच्या नावाने आधुनिकतेचा युक्तिवाद मांडला. तर अधोक्षजने मातीशी निष्ठा, संस्कार आणि माणुसकी बद्दल बोलला. आता यात कोण बाजी मारणार? मोहीतराव कोणता डाव खेळणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. "विठूच्या वाडीची प्रगती शिक्षणाने होणार आणि त्यासाठी आम्ही शाळा उभी करणारच! या दिवाळीच्या मुहूर्तावर एका खास व्यक्तीच्या हातून शाळेची पहिली वीट ठेवली जाणार आहे." इंद्रायणीच्या या घोषणेने सर्वत्र खळबळ उडणार आहे.

Indrayani Marathi Serial Update
Tharala Tar Mag : ठरलं तर मग! पूर्णा आजीची धमाकेदार एन्ट्री, कोण साकारणार भूमिका?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com