Chhaava: शेवटचा सीन अन् असंख्य यातना; 'छावा' चित्रपटातील 'हा' सीन शूट करताना विकीचे हात रात्रभर ठेवले बांधून, किस्सा वाचून व्हाल स्तब्ध

chhaava Movie : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'छावा' आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील अनेक अंगावर काटा आणणारे किस्से बाहेर येत आहेत.
Chhaava Movie
Chhaava Movie SAAM TV
Published On

Chhaava Movie: अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना खूप उत्सुक्ता आहे. छावा चित्रपटाबद्दल निर्माण झालेल्या वादानंतरही चाहते मोठ्या पडद्यावर विकीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत पहायचे आहे. या भूमिकेसाठी विकीने अफाट मेहनत घेतल्याचे त्याच्या प्रत्येक मुलाखतीतून समोर येते असाचं एक क्लायमॅक्स सीनचा किस्सा समोर आला आहे. ज्यावरुन अंदाज बांधता येते या चित्रपटादरम्यान विकीने कीती यातना सहन केल्या असतील.

'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब जेव्हा कैद करुन बंदी बनवतो. या सीनचं शूट करणं विकीसाठी कठीण होत कारण या सीनचं शूट करताना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी रात्रभर विकीचे हात रश्शीने घट्ट बांधले होते. त्या संपूर्ण सीनच्या दरम्यान विकीचे हात रात्रभर बांधलेलेच होते.

Chhaava Movie
Priyanka Chopra :'तू मान मेरी जान'; प्रियांका-निकचा हटके परफॉर्मन्स बघून चाहते फिदा, Video व्हायरल

दुसऱ्या दिवशी जेव्हा विकीचे हात सोडण्यात आले तेव्हा त्याचा हात सुन्न पडले होते. विकीची अशी अवस्था पाहून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी त्याला महिनाभराची सुट्टी दिला होती. त्यानंतर विकी ठीक झाल्यावर तो पुन्हा त्याच उत्साहात शूटिंगला परतला. अशाप्रकारे 'छावा'मधील प्रत्येक सीनसाठी विकीने कठोर मेहनत आणि जिद्दीने केले आहेत.

Chhaava Movie
Akshay Kumar: अक्षय कुमारने विकला आलिशान अपार्टमेंट; ७८% पेक्षा जास्त झाला नफा, किती मिळाले पैसे?

'छावा' या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. तर चित्रपटात क्रूर औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com