Best Marathi Movies : ऍमेझॉन प्राइमवरील हे १५ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट नक्की पाहा

ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ सारख्या तुमच्या आवडत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता अशा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांची यादी ही पुढीलप्रमाणे!
 15 Best Marathi Movies
15 Best Marathi MoviesSaam Tv
Published On

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर(OTT Platform) तुम्हाला अनेक ऑनलाइन किती चित्रपट (Movies)पाहायला मिळत असतात. या अनेक चित्रपटांमधील नक्की कोणता चित्रपट पहायचा आणि कोणता नाही पहायचा या विचारतच आपला बराच वेळ जात असतो. जर तुम्ही ऍमेझॉन प्राइम व्हिडिओचे सदस्य असाल आणि या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी सर्वोत्तम मराठी चित्रपट शोधतअसाल ? तर यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहण्यासाठी सर्वोत्तम मराठी चित्रपटांची यादी आम्ही तुमच्यासाठी तयार केली आहे. भारतात ऑनलाइन पाहू शकणारे काही उत्तम मराठी चित्रपट शोधत आहात का? तर, आम्ही तुम्हाला चित्रपट शोधण्यात मदत करू शकतो. ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ सारख्या तुमच्या आवडत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता अशा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांची यादी ही पुढीलप्रमाणे!

 15 Best Marathi Movies
विजय देवरकोंडाचा जबरदस्त ॲक्शनपट ‘लायगर’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

१) अशी ही बनवाबनवी (१९८८)

ऍमेझॉन प्राइमवरील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांच्या यादीतील पहिल्या चित्रपट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी' . या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ रे, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगावकर, प्रिया अरुण-बेर्डे, निवेदिता जोशी-सराफ, नयनतारा आणि विजू खोटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चार मित्र भाड्याने घर शोधत असतात. घर मालकीण केवळ विवाहित जोडप्यांना घर राहायला देणार असं सांगते, म्हणून दोन मित्रांना महिलांचा वेषभूषा करून त्यांच्या दोन मित्रांसोबत या घरी भाडेकरू म्हणून राहायला जातात.

२) एक उनाड दिवस (२००६)

या यादीतील पुढील चित्रपट आहे 'एक उनाड दिवस', हा देखील ऍमेझॉन प्राइमच्या यादीतील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट खूप मजेदार आणि रंजक आहे . या चित्रपटात अशोक सराफ, विजय पाटकर, इला भाटे, रवींद्र बेर्डे, विजय गोखले आणि शहाजी काळे यांच्या भूमिका आहेत. विश्वास हा एक वर्कहोलिक बिझनेसमन आहे ज्याने त्याच्या आयुष्यात कधीही आनंद घेतला नाही. एके दिवशी, त्याला त्याचा मित्र गोविंदा भेटतो, जो त्याला सांगतो की मर्यादित पैशात तू आनंदी राहू शकतो.

३) श्वास (२००४)

या यादीतील पुढचा चित्रपट म्हणजे 'श्वास'. हा एक ड्रामा चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन संदीप सावंत यांनी केले आहे. चित्रपट बघताना डोळ्यात डोळ्यात पाणी येत. या चित्रपटात अरुण नलावडे, अश्विन चितळे, संदीप कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांच्या भूमिका आहेत.एखाद्या आजराशी न जिंकता येणाऱ्या परिस्थितीत एका वृद्धाने आपल्या नातवाला जीवनातील अनमोल सौंदर्य कसे दाखविण्याचा प्रयत्न केला त्याची ही कथा आहे. हा चित्रपट जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन असणे किती गरजेचा आहे यावर आधारित आहे.

४) बापजन्म (२०१७)

'बापजन्म' हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन निपुण अविनाश धर्माधिकारीयाने केले आहे. ऍमेझॉन प्राइमवरील हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट तुमचे मनोरंजन करेल. भास्कर, एक वृद्ध, त्याचा कुत्रा आणि नोकरासह एक नीरस जीवन जगत असतो पण, अचानक तो आपल्या मुलांबरोबरचे नाते सुधारण्याचे मिशन सुरु करतो.

५) देऊळ (२०११)

ऍमेझॉन प्राइम वरील आमच्या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांच्या यादीतील पुढील चित्रपट तुमचे मनोरंजन नक्कीच होईल. हा चित्रपट म्हणजे 'देऊळ'. केश्या हा साध्या गावकऱ्याचा असा विश्वास आहे की देव आपल्या गावात आला आहे, परंतु प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. परंतु त्यच्या या विश्वासाचे बाजारीकरण सुरु होते तेव्हा परिस्थिती खूप बदलते.

 15 Best Marathi Movies
बॉलिवूड गाजवणाऱ्या कार्तिक आर्यननं सांगितला तो 'वाईट' काळ, 'थर्ड हँड कार...'

६) शाळा (२०११)

या यादीतील पुढचा चित्रपट म्हणजे 'शाळा', भारताच्या ग्रामीण भागातील ७० च्या दशकातील ही कथा ९वी इयत्तेच्या चार मुलांची आहे जी आपले नशीब लिहित आहेत. जोशी नावाचा एक मुलगा शिरोडकर नावाच्या एका मुलीच्या प्रेमात वेडा झाला आहे. शिरोडकर आणि जोशी दोघेही एकाच वर्गात शिकत आहेत.ऍमेझॉन प्राइम वरील हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे.

७) प्रवास (२०२०)

या यादीतील पुढचा चित्रपट म्हणजे 'प्रवास'. चित्रपट खूप भावनिक आहे. ऍमेझॉन प्राइमवरचा हा उत्तम मराठी चित्रपट पाहायला विसरू नका. प्रवास हा चित्रपटात अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे या वृद्ध जोडप्याच्या प्रवासाची कथा आहे. अशोक सराफ यांनी अभिजात इनामदार यांची तर पद्मिनी कोल्हापुरे यांनी लता इनामदार यांची भूमिका साकारली आहे. प्रत्येकाला या जगात जगण्यासाठी एक विशिष्ट वेळ आहे आणि हे महत्वाचे आहे असे या चित्रपटातून सांगण्यात आले आहे.

८) मुंबई पुणे मुंबई (२०१० )

या यादीतील पुढचा ड्रामा, रोमान्स चित्रपट म्हणजे 'मुंबई पुणे मुंबई'. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला पुण्यात आलेली मुंबईची मुलगी, त्याला नाकारण्याच्या कल्पनेने एका अनोळखी व्यक्तीसोबत दिवस घालवते. ऍमेझॉन प्राइमवरचा हा उत्तम मराठी चित्रपट पाहायला विसरू नका.

९) नटसम्राट(२०१६)

या यादीतील पुढचा चित्रपट म्हणजे 'नटसम्राट'. हा चित्रपट खूप चांगला आहे आणि भावनिक चित्रपट देखील आहे. ऍमेझॉन प्राइमवरवरील हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे. निवृत्त झालेल्या एका अभिनेत्याची कथा. एक वृद्ध अभिनेता आणि त्याच्या पत्नीला त्यांच्या मुलांसाठीच्या भावना या चित्रपटातून मांडल्या आहेत.

१०) डबल सीट (२०१५)

डबल सीट या चित्रपटात नवविवाहित लव्हबर्ड्स अमित आणि मंजिरी यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. जे मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात आपले घर शोधण्यासाठी धडपडत आहेत.

११) हाफ तिकीट(२०१६)

'हाफ तिकीट' हा देखील या वर्षातील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे. ही कथा दोन झोपडपट्टीतील मुलांची आहे जे नवीन पिझ्झा शॉप मधूल पिझ्झा खाण्यचे स्वप्न बघत असतात. पिझ्झाच्या तुकड्यासारख्या छोट्या इच्छा, सामान्य माणसासाठी किती मोठा असू शकते, पण या मुलांसाठी ते खूप महाग आणि स्वप्नासारखे आहे हे या चित्रपटात दाखवले आहे.

१२) YZ (२०१६)

या यादीतील पुढचा चित्रपट 'YZ' हा आहे. हा एक विनोदी चित्रपट आहे. ही कथा गजानन नावाच्या ३३ वर्षांच्या शाळेतील शिक्षक आणि १८ वर्षांच्या मुलाची आहे.हे दोघेही एकमेकांच्या विरोधात आहेत. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सागर देशमुख, सई ताम्हणकर आणि अक्षय टांकसाळे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

१३) एक तारा ( २०१५)

एक तारा ही एका निष्पाप तरुणाची कथा आहे, ज्याला गाण्याची आवड आहे. त्याने एक रिअॅलिटी शो जिंकला आणि तो प्रसिद्ध झाला. प्रसिद्धी आणि दारू यांच्यातील संघर्षला कसे सामोरे जायचे याची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

१४) जून ( २०२१)

या यादीतला पुढचा चित्रपट आहे 'जून'. या चित्रपटातील अभिनेत्री नेहा तिची बॅग भरते आणि औरंगाबादला पोहोचते. हे तिच्या नवरा अभिजितचं गाव असता. प्रवास करत शहरात आल्यावर तिची भेट नीलशी झाली. थोडक्‍यात तिला अभिजितच्या घराकडे जाण्यासाठी नीलकडे पत्ता विचारते. त्यानंतर काय होते? हे आपण चित्रपट बघून जाणून घ्या.

१५) माऊली ( २०१८)

या यादीतील शेवटचा चित्रपट म्हणजे 'माऊली'. ऍमेझॉन प्राइम वरील हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात सैयामी खेर सोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहे, ऍमेझॉन प्राइमवर हे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पाहायला विसरू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com