Chalaki Chanti Admitted ICU: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला हृदयविकाराचा तीव्र झटका; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबासहित चाहते चिंतेत

तेलुगू कॉमेडी अभिनेता चालाकी चंटीला शनिवारी हृदयविकाराचा तिव्र झटका आला.
Chalaki Chanti Admitted ICU
Chalaki Chanti Admitted ICUSaam Tv

Bigg Boss Fame Chalaki Chanti Suffered Heart Attack: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तेलुगू कॉमेडी अभिनेता चालाकी चंटी याला शनिवारी हृदयविकाराचा तिव्र झटका आला, लगेचच तात्काळ चालाकीला हैदराबादमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. मात्र, त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. त्याच्या तब्येतीबाबत त्याच्या मित्रांनी किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तींनी देखील अपडेट शेअर केलेले नाही. (Tollywood)

Chalaki Chanti Admitted ICU
Shweta Tiwari A Proud Mother: ती स्टार कीड नाही तरीही.. पलकचा अभिनय पाहून आई श्वेता तिवारी भारावली..

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चालाकी चंटीला सध्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, सध्या त्याच्यावर हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याने उपचार सुरू आहेत. चालाकी चंटी याला छातीत दुखत असल्याचे सांगताच त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात दाखल केल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी प्राथमिक तपासात सांगितले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचा दावा अहवालात करण्यात आला असून तथापि, रुग्णालयाकडून अधिकृत हेल्थ अपडेटची प्रतीक्षा आहे. (Bollywood Actor)

Chalaki Chanti Admitted ICU
Anupama Serial Update: लग्नाच्या वाढदिवसाला अनुपमा-अनुजची भेट होणार; मालमत्ता हडपण्यासाठी बरखा आखणार नवी चाल, मालिकेत नवा ट्विस्ट

अभिनेत्याच्या या बातम्यांनंतर त्याचे चाहते अस्वस्थ झाले असून सर्वजण चालाकी चंटी लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. आपल्या कॉमेडी टायमिंगसाठी ओळखला जाणारा चालाकी चंटी हा एक सुप्रसिद्ध कलाकार आहे. ईटीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'जबरदस्थ' या कॉमेडी शोमध्ये तो दिसतो. चालाकी चंटीचे खरे नाव विनय मोहन आहे. (Bollywood Film)

ईटीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'जबरदस्थ' या कॉमेडी शो मध्ये त्याने केलेल्या कॉमेडीमुळे चाहत्यांमध्ये त्याची एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली. नागार्जुनने होस्ट केलेल्या बिग बॉस तेलुगूच्या सहाव्या सीझनमध्येही तो सहभागी झाला होता. मात्र, त्याला मध्यंतरी शोमधून बाहेर काढण्यात आले. सोशल मीडियावर चाहते त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com