
Celebrity Masterchef Winner: सेलेब्रिटी मास्टरशेफ 2025 च्या ग्रँड फिनालेमध्ये अभिनेता गौरव खन्नाने विजेतेपद पटकावले आहे. शोच्या अंतिम फेरीत तेजस्वी प्रकाश, निक्की तंबोली, फैसल शेख (मिस्टर फैसू), आणि राजीव अदातिया यांनी भाग घेतला होता. गौरव खन्नाने शेफ रणवीर बरार यांच्या सिग्नेचर डिश 'दक्षिण एक्सप्रेस' उत्कृष्टपणे सादर केली आणि जजेसची मने जिंकली.
मराठीमोळी मुलगी निक्की तंबोळीने फर्स्ट रनर-अपचा मान मिळवला, तर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सेकंड रनर-अप ठरली. निक्की तंबोळीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे विजेत्याच्या नावाबाबत चर्चेला उधाण आले होते. या शो साठी प्रमुख पाहुणे म्हणून शेफ संजीव कपूर यानं आमंत्रित करण्यात आले होते. या शोमधील गौरवच्या उत्तम सादरीकरण आणि लाजवाब जेवणामुळे तो २५ लाख रुपये, ट्रॉफी आणि प्रतिष्ठित मास्टरशेफ कोटचा मानकरी ठरला आहे.
सेलेब्रिटी मास्टरशेफ 2025 शोच्या सुरुवातीला 12 सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी झाले होते, ज्यात दीपिका कक्कड़, अर्चना गौतम, उषा नाडकर्णी, कबिता सिंह, आयशा जुल्का, अभिजीत सावंत आणि चंदन प्रभाकर यांचा समावेश होता. स्पर्धेच्या दरम्यान काही स्पर्धक आरोग्याच्या कारणास्तव किंवा इतर कारणांमुळे शोमधून बाहेर पडले. सेलेब्रिटी मास्टरशेफ 2025 या शोचे जजेस शेफ रणवीर बरार आणि शेफ विकास खन्ना होते, तर फराह खान या शोची होस्ट होती.
गौरव खन्नाचा हा विजय त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण ठरला आहे. त्याच्या उत्कृष्ट पाककौशल्यामुळे त्याने ही ट्रॉफी मिळवली आहे. फिनालेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचे अभिनंदन करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे कलर ब्लाइंड असूनही गौरव सेलिब्रिटी मास्टरशेफ ठरल्यामुळे त्याचे विशेष कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.