Famous Artist Death: सिनेमाचा जादुई आवाज हरपला, ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Famous Artist Death: ‘ट्रान्सफॉर्मर्स’मधील ऑप्टिमस प्राइमला आवाज देणारे प्रसिद्ध व्हॉइस आर्टिस्ट पीटर कलन यांचे वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
Canadian-American voice actor Peter Cullen passes away
Canadian-American voice actor Peter Cullen passes awaySaam Tv
Published On

Famous Artist Death: हॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘ट्रान्सफॉर्मर्स’ या लोकप्रिय फ्रँचायझीमधील आयकॉनिक पात्र ऑप्टिमस प्राइमला आवाज देणारे प्रसिद्ध व्हॉइस आर्टिस्ट अभिनेते पीटर कलन यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. २६ ऑगस्ट रोजी लॉस एंजेलिस येथील त्यांच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या एजंटने दिली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

पीटर कलन हे केवळ ‘ट्रान्सफॉर्मर्स’मधील ऑप्टिमस प्राइमच्या आवाजासाठीच नव्हे, तर अनेक लोकप्रिय अॅनिमेशन आणि चित्रपटांमधील त्यांच्या आवाजासाठी ओळखले जात होते. १९८४ मध्ये आलेल्या ‘Transformers’ अॅनिमेटेड मालिकेत त्यांनी पहिल्यांदा ऑप्टिमस प्राइमला आवाज दिला. त्यानंतर अनेक अॅनिमेटेड मालिका, व्हिडीओ गेम्स आणि चित्रपटांमध्ये त्यांनी हे पात्र साकारले.

Canadian-American voice actor Peter Cullen passes away
Toxic: यशच्या 'टॉक्सिक'ला बकवास म्हणणं प्रसिद्ध यूट्यूबरला पडलं महागात; थेट मिळाली कायदेशीर नोटीस

ऑप्टिमस प्राइमच्या आवाजाने मिळवली वेगळी ओळख

ऑप्टिमस प्राइमच्या दमदार आणि गंभीर आवाजामुळे पीटर कलन यांनी जगभरातील चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. त्यांनी या पात्राच्या आवाजाला केवळ ताकदच नाही, तर संवेदनशीलता दिली. त्यानंतर २००७ पासून सुरू झालेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’च्या लाइव्ह-अॅक्शन चित्रपटांमध्येही त्यांनी ऑप्टिमस प्राइमला आवाज दिला. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘Transformers: Rise of the Beasts’पर्यंत त्यांनी ही भूमिका साकारली.

Canadian-American voice actor Peter Cullen passes away
Kapuskonda Movie: सचिन पिळगावकर-मधुराणी गोखले पुन्हा आमनेसामने; 'कापूसकोंडा' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

‘विनी द पूह’च्या पात्रालाही दिला आवाज

पीटर कलन यांनी ‘विनी द पूह’ फ्रँचायझीमधील लोकप्रिय पात्र ईयोरलाही आवाज दिला होता. याशिवाय ‘Knight Rider’मधील KARR आणि ‘Predator’मधील आवाजाच्या कामासाठीही ते प्रसिद्ध होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९६०च्या दशकात झाली आणि अनेक दशकांपर्यंत त्यांनी अॅनिमेशन, टेलिव्हिजन, चित्रपट आणि व्हिडीओ गेम्समध्ये काम केले.

व्हॉइस अॅक्टिंग विश्वावर शोककळा

व्हॉइस अॅक्टिंग क्षेत्रातील योगदानासाठी पीटर कलन यांना २०१० मध्ये ‘Transformers Hall of Fame’मध्ये स्थान देण्यात आले होते. २०२३ मध्ये त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारानेही गौरवण्यात आले. त्यांच्या निधनाने ‘ट्रान्सफॉर्मर्स’च्या चाहत्यांसह संपूर्ण व्हॉइस अॅक्टिंग विश्वावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com