Urvashi Rautela Viral Video : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. उर्वशीने सोशल मीडियावर केलेली प्रत्येक पोस्ट टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतशी (Rishabh Pant) जोडली जात आहे. दरम्यान, आता उर्वशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती आय लव्ह यू... आय लव्ह यू म्हणताना दिसून येत आहे.
उर्वशी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती नेहमी तिच्या अभिनयासोबतच फिटनेसमुळे ओळखली जाते. उर्वशी (Urvashi Rautela) सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अलीकडे, तिने इंस्टाग्रामवर एक प्रेमाने भरलेला व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती 'एक बार आय लव्ह यू कह दो... एक बार आय लव्ह यू बोल दो प्लीज' असे म्हणताना दिसली.
उर्वशीने हा व्हिडिओ पोस्ट करताच, इंटरनेटवर तो तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत उर्वशीने म्हटलेलं आय लव्ह यू हे ऋषभ पंतसाठीच आहे असं नेटकऱ्यांना वाटत आहे. अनेकांनी तसा अंदाजही लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. यावर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामन्यात उर्वशी मैदानावर दिसली होती.
इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी उर्वशी ऑस्ट्रेलियाला गेली होती. तेव्हा नेटकऱ्यांनी दावा केला होता की उर्वशी ऋषभ पंतसाठी तिथे गेली होती. त्यानंतर प्रत्येक पोस्ट केल्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. सततच्या ट्रोलिंगमुळे त्रस्त झालेल्या उर्वशीने मौनही सोडलं होतं. इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून तिने ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं होतं.
उर्वशीने सांगितलं व्हिडीओ मागचं सत्य
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उर्वशीने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने या व्हिडिओचे सत्य सांगितले आहे. अभिनेत्रीने लिहिले, 'आजकाल माझा आय लव्ह यू व्हिडिओ व्हायरल होत आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की हा व्हिडिओ केवळ अभिनयासाठी होता. हे एका संवाद दृश्यासाठी दिग्दर्शित केले गेले होते, ना ते कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी होते किंवा व्हिडिओ कॉलचा भाग नाही. असं उर्वशीने स्पष्ट केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.