Border: 'बॉर्डर' चित्रपटाला २८ वर्षे पूर्ण; आजही चित्रपट पाहून उफाळते देशभक्तीची भावना

Border Movie: १९७१ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या ऐतिहासिक युद्धावर आधारित जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ या चित्रपटाला १२ जून २०२५ रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहेत.
Border Movie
Border MovieSaam Tv
Published On

Border Movie: १९७१ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या ऐतिहासिक युद्धावर आधारित जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ या चित्रपटाला १२ जून २०२५ रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. १२ जून १९९७ रोजी मुंबईतील मेट्रो थिएटरमध्ये या चित्रपटाचा पहिला खेळ प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आज म्हणजे १३ जून रोजी हा चित्रपट मुंबई उपनगर व दिल्लीमध्येही प्रदर्शित झाला. या चित्रपटाने त्या काळात केवळ तिकीट खिडकीवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनातही विशेष स्थान निर्माण केले. या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानातील बिकानेर आणि जोधपूर येथे झाले होते.

चित्रपटात सनी देओलने मेजर कुलदीपसिंह चांदपुरी यांची भूमिका साकारली असून, जॅकी श्रॉफने विंग कमांडर एंडी बजवा, सुनील शेट्टीने कॅप्टन शेखावत, अक्षय खन्नाने सेकंड लेफ्टनंट धरमवीर यांच्या व्यक्तिरेखा साकारून युद्धातील शौर्य आणि बलिदानाचे वास्तव मांडले. राखी गुलजार, तब्बू, पूजा भट्ट, कुलभूषण खरबंदा, सुदेश बेरी, पुनीत इस्सार, अमृत पाल आणि राजीव गोस्वामी यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या.

Border Movie
Ahmedabad Plane Crash: 'गुडबाय इंडिया...'; अहमदाबाद प्लॅन अपघातापूर्वी व्हिडीओ करणारा सेलिब्रिटी नक्की कोण? काय म्हणाला व्हिडीओमध्ये

चित्रपटातील संगीतही तितकेच गाजले. जावेद अख्तर यांनी लिहिलेली आणि अन्नू मलिक यांनी स्वरबद्ध केलेली गीते ‘संदेसे आते हैं’, ‘मेरे दुश्मन मेरे भाई’ आणि ‘हमने जबसे मोहब्बत’ आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. ‘संदेसे आते हैं’ हे गाणे तर युद्धातील सैनिकांची भावना अतिशय प्रभावीपणे मांडणारे असून, ते आजही देशभक्तीचे प्रतीक मानले जाते. इश्वर बिदरी व निर्मल जानी यांचे छायाचित्रण आणि दीपक विरकूड यांचे संकलनही चित्रपटाच्या यशात मोलाचे ठरले.

Border Movie
Housefull 5 Box Office Collection: 'हाउसफुल 5' च्या कमाईला ब्रेक लागायला सुरुवात; सातव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केला इतक्या कोटींचा गल्ला

बॉर्डर’ या चित्रपटाने मेट्रो थिएटरमध्ये रौप्यमहोत्सवी यश संपादन केले होते. आज २८ वर्षांनंतरही या चित्रपटाचा सामाजिक प्रभाव आणि देशभक्तीची भावना तितकीच तीव्र आहे. चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर जे. पी. दत्ता यांच्या उपस्थितीत एक विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता, या सोहळ्यात चित्रपटाची कालातीत लोकप्रियता अधोरेखित झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com