Jawan Vs Pathan Movie: रेकॉर्डब्रेक करूनही 'पठान'ला मागे टाकण्यात 'जवान' अयशस्वी, आतापर्यंतच्या कमाईचा आकडा किती?

Jawan Movie Box Office Collection: जवान चित्रपट दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर (Box Office) रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.
Jawan Vs Pathan Movie
Jawan Vs Pathan MovieSaam TV
Published On

Shah Rukh Khan Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या जवान चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. जवान चित्रपट दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर (Box Office) रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. फक्त भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये जवानची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने जगभरात देखील चांगलीच कमाई केली आहे. शाहरुखच्या जवानची सगळीकडे हवा असली तरी देखील कमाईच्या बाबतीत त्याचा पठान चित्रपटच सर्रस ठरला आहे. २०२३ च्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या शाहरुखच्या 'पठान'ने (Pathan Movie) बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन केले.

Jawan Vs Pathan Movie
Ashish Vidyarthi On Trollers: 'हे खूप अनपेक्षित होतं..' आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्या लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांना सुनावले

शाहरुखच्या पठानच्या पुढे जवानची कमाई कमीच असल्याचे बोलले जात आहे. सध्या जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल आहे. पण 'जवान' 'पठाण'चा रेकॉर्ड मोडू शकणार का?, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. 'जवान' चित्रपट प्रदर्शित होऊन ९ दिवस झाले असून ८ दिवसांत चित्रपटाने एकूण ३८६.२८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने आठव्या दिवशी फक्त १९.५० कोटींची कमाई केली. आठव्या दिवसाच्या कमाईची अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. पण हा आकडा पुढे-मागे असू शकतो.

Jawan Vs Pathan Movie
Hemangi Kavi Video: 'जवान' पाहण्याची उत्सुकता, 'चलेया' गाणं लागताच थिएटरमध्ये थिरकली हेमांगी कवी

जवान फक्त भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये चांगली कमाई करत आहे. जवानच्या जगभरातील कलेक्शबद्दल सांगायचे झाले तर, 'जवान' चित्रपटाने ७ दिवसांत ६६०.०३ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. अशा परिस्थितीत आठव्या दिवशी हा चित्रपट ७०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, 'पठान' चित्रपटाविषयी सांगायचे झाले तर, पहिल्याच दिवशी पठानने ५७ कोटींची दमदार कमाई केली होती. एवढेच नाही तर, ओपनिंग वीकेंडमध्ये २८०.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. सॅकनिकच्या अहवालानुसार, पठानचे जगभरातील कलेक्शन १०५२ कोटी रुपये इतके आहे. तर देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर कमाई ५४३.०५ कोटी रुपये आहे. या दमदार कमाईसह पठान चित्रपट आजही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यानंतर, 'गदर २' ५१५.०३ कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

Jawan Vs Pathan Movie
Bigg Boss 17 Promo: 'बिग बॉसचा वेगळा रंग पाहून व्हाल दंग', 'बिग बॉस १७'चा प्रोमो आऊट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com