बॉलिवूडच्या (Bollywood) ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Actress Shabana Azmi) आज आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहे. शबाना आझमी या बॉलिवूडमधील नामवंत कलाकारांपैक एक आहेत. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर शबाना आझमी यांनी बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केले आहे. ७३ वर्षांच्या असलेल्या शबाना आझमी यांचा आजही फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे.
शबाना आझमी या प्रेमप्रकरणामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या. शबाना आझमी यांनी त्यांच्यापेक्षा वयाने १० वर्षांनी मोठे आणि विवाहित असलेल्या जावेद अख्तरांसोबत लग्न केले. या प्रेमप्रकरणांमुळे त्या बऱ्याच काळ चर्चेत राहिल्या. दोघांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. आज आपण शबाना आझमी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आणि जावेद अख्तर यांच्या लव्हस्टोरीबद्दल (Shabana Azmi And Javed Akhatar Lovestory) जाणून घेणार आहोत...
शबाना आझमी या त्यांच्या प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत आल्या होत्या. त्यांनी आई-वडिलांच्या विरोधात बंड पुकारत जावेद अख्तर यांच्यासोबत लग्न केले होते. शबाना आणि जावेद अख्तरची प्रेमकहाणी त्यांच्या घरापासून सुरू झाली होती. शबाना आझमी यांचे वडील कैफी आझमी यांच्याकडून कविता ऐकण्यासाठी जावेद अख्तर त्यांच्या घरी यायचे. यावेळी शबाना आझमी या त्यांच्या आईसोबत या मैफिलीमध्ये सहभागी व्हायच्या. यादरम्यान शबाना आझमी आणि जावेद अख्तर एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले.
शबाना आझमींच्या कुटुंबीयांनी या प्रेमाला आणि लग्नाला विरोध केला होता. कारण जावेद अख्तर हे त्यावेळी विवाहित होते आणि त्यांना दोन मुलं देखील होती. अशा परिस्थितीत आपली मुलगी अख्तरांच्या नात्यात येऊ नये असे त्याला वाटत होते. पण शबाना आझमी या आपल्या बंडावर ठाम होत्या. लग्न करेल तर जावेद अख्तरांनी असं त्यांचे म्हणणे होते. १९८४ मध्ये शबाना आझमी यांनी त्यांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या असलेल्या जावेद अख्तर यांच्याशी लग्न केले. जावेद अख्तर यांनी लग्नाच्या ७ वर्षानंतर पहिली पत्नी हनी इराणी यांना घटस्फोट दिला होता.
शबाना आझमी यांचे दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासोबत देखील अफेअर होते. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी या नात्याबद्दल खुलासा केला होता. त्या शेखर कपूर यांच्यासोबत अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होत्या. पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. जया भादुरी अभिनीत 'सुमन' चित्रपट पाहून शबाना आझमी इतक्या प्रभावित झाल्या होत्या की त्यांनी सिनेसृष्टीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. शबाना आझमी यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगाचये झाले तर, शबाना यांना 'अंकुर', 'अर्थ', 'पार', 'गॉडमदर' आणि 'खंधार'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. शबाना आझमी यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.