Rinku Rajguru Insta Post: ‘...आता सर्व व्यवस्थित झालंय’, रिंकू राजगुरूने सांगितलं इन्स्टावरील पोस्ट गायब होण्यामागचं कारण

Rinku Rajguru News: रिंकूने तिच्या सोशल मीडियावरील तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ डिलीट केल्या आहेत, अशी चर्चा होत होती. यावर अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलंय.
Rinku Rajguru Revealed Disappeared Insta Post
Rinku Rajguru Revealed Disappeared Insta PostSaam Tv
Published On

Rinku Rajguru Revealed Disappeared Insta Post

सैराट चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली रिंकू राजगुरू सध्या प्रचंड चर्चेत आहे. रिंकू कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. रिंकू सध्या सोशल मीडियावर एका कारणामुळे प्रचंड चर्चेत आहे. रिंकूने तिच्या सोशल मीडियावरील तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ डिलीट केल्या आहेत, अशी चर्चा होत होती. नेमकं अभिनेत्रीने असं का केलं याचं उत्तर जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक होते. नुकतंच रिंकूने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत या प्रश्नाचं उत्तर दिलंय.

Rinku Rajguru Revealed Disappeared Insta Post
Vidya Balan Funny Video: कुशलनंतर भाऊ कदमचीही विद्या बालनला भुरळ, ‘ऐका हो ऐका’ म्हणत भन्नाट Video शेअर

अलीकडेच रिंकूच्या सर्वच सोशल मिडीयावरील पोस्ट तिने हटवल्या होत्या. सोशल मीडियावर आणि तिच्या चाहत्यांमध्ये त्यावेळी संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, अभिनेत्री सोशल मिडीयाला राम राम ठोकते की काय असा सुद्धा अनेकांना प्रश्न पडला होता. अशातच या सर्वांवर अभिनेत्रीने उत्तर दिलं आहे. अभिनेत्रीने नेमक्या तिच्या सोशल मीडिया पोस्ट कशा काय डिलीट झाल्या, यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Rinku Rajguru Revealed Disappeared Insta Post
Santosh Juvekar Post: संतोष जुवेकरचा अजूनही स्ट्रगलर साला? चाळीतील दुकानात करतोय हेअर कट

अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर सांगितलं की,“सर्वांना नमस्कार. माझ्या इन्स्टाग्राम अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. आणि आता सर्व व्यवस्थित झालेलं आहे. येत्या काही दिवसांत मी माझ्या अकाऊंटवरून पोस्ट टाकायला सुरुवात करेल. प्रेक्षकहो तुमच्या प्रेमाबद्दल आणि दाखवलेल्या काळजीबद्दल मनापासून आभार.” तिने स्वतःहुन एकही पोस्ट झालेली नाही, असं देखील तिने स्पष्ट केलेलं आहे. रिंकू कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर तब्बल ८ लाखांहून जास्त फॅन्स आहेत.

Rinku Rajguru Post
Rinku Rajguru PostInstagram

रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रिंकूने फिल्म इंडस्ट्रीमध्ये २०१६ मध्ये ‘सैराट’मधून डेब्यू केलं. त्यानंतर तिने काही वेबसीरीज आणि चित्रपटांतही मुख्य भूमिका साकारली होती. कागर, झुंड, अनपॉस सह अन्य कलाकृतींमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. सध्या तिचा चाहतावर्ग तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे. (Entertainment News)

Rinku Rajguru Revealed Disappeared Insta Post
Bollywood Actress In Trouble: सलमान खानच्या हिरोईन विरोधात अटक वाॅरंट; नेमकं काय आहे प्रकरण? वाचा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com