Crew Movie Collection
Crew Movie CollectionSaam Tv

Crew Box Office Collection Day 5: करीना कपूर- क्रिती सेनॉनच्या 'क्रू'चा वेग झाला कमी, पाचव्या दिवशीही केली फक्त इतकी कमाई

Crew Movie Worldwide Collection: क्रू चित्रपटामध्ये करीना, क्रिती आणि तब्बू या ३ अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या तिघींच्याही अभिनयावर प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे.
Published on

Crew Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor), क्रिती सेनॉन (Kriti Senon) आणि तब्बू स्टारर 'क्रू' चित्रपट (Crew Movie) बॉक्स ऑफिसवर धांसू कामगिरी करतान दिसत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट चांगलाच आवडत आहे. या चित्रपटाने दमदार ओपनिंग केली. पहिल्या आठवड्यात क्रू चित्रपटाला चांगला फायदा झाला. पण वर्किंग डेजमुळे क्रूच्या कमाईच्या आकड्यामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा चित्रपट फक्त बॉक्स ऑफिसच नाही तर वर्ल्डवाइड देखील चांगली कमाई करताना दिसत आहे. आता या चित्रपटाच्या पाचव्या दिवसाची कमाई (Crew Box Office Collection Day 5) समोर आली आहे.

क्रू चित्रपटामध्ये करीना कपूर, क्रिती सेनॉन आणि तब्बू या ३ अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या तिघींच्याही अभिनयावर प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडत आहे. या चित्रपटाने ओपनिंग डेच्या दिवशी चांगली कमाई करत सुरूवात केली. पहिला विकेंड या चित्रपटासाठी चांगला ठरला. पण सोमवार आणि मंगळवार वर्किंग डे असल्यामुळे या दिवशी चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यात घसरण पाहायला मिळाली.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, करीना कपूर, क्रिती सेनॉन आणि तब्बू यांच्या 'क्रू' चित्रपटाने 9.25 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9.75 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी 10.5 कोटी, चौथ्या दिवशी 4.2 कोटी रुपयांची कमाई केली. तर पाचव्या दिवशी या चित्रपटाने देशभरामध्ये 3.50 कोटींची कमाई केली. अशाप्रकारे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 37.20 कोटींची कमाई केली.

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉनचा 'क्रू' चित्रपट जगभरात देखील चांगले कलेक्शन करताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 20.7 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 20.43 कोटी रुपयांचे वर्ल्डवाइड कलेक्शन केले. तर तिसऱ्या दिवशी 'क्रू' चित्रपटाने 21.40 रुपयांचा आणि चौथ्या दिवशी 8.20 कोटींचा गल्ला जमा केला. अशा प्रकारे या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 70.73 कोटींची कमाई केली आहे.

Crew Movie Collection
Prabhu Deva Birthday: प्रभू देवा कसा बनला भारताचा 'मायकल जॅक्सन', 100 पेक्षा जास्त चित्रपटातील गाणी केलेत कोरिओग्राफ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com