Naveen Polishetty: बॉलिवूड अभिनेत्याचा अमेरिकेमध्ये भीषण अपघात, रुग्णालयामध्ये उपचार सुरू

Naveen Polishetty Bike Accident In US: अमेरिकेमध्ये रस्ते अपघातामध्ये नवीन पॉलिशेट्टी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवीन पॉलिशेट्टीच्या अपघाताची माहिती कळताच त्याचे चाहते चिंतेत आले आहेत.
Naveen Polishetty Bike Accident In US
Naveen Polishetty Bike Accident In USSaam Tv

Naveen Polishetty Film Chhichhore:

बॉलिवूडचा (Bollywood) दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतचा चित्रपट 'छिछोरे'मध्ये (Chhichhore) त्याच्या मित्राची भूमिका साकारणाऱ्या 'अ‍ॅसिड'म्हणजेच अभिनेता नवीन पॉलिशेट्टीचा भीषण अपघात झाला आहे. नवीन पॉलिशेट्टी हा हिंदी आणि तेलगू चित्रपट अभिनेता आणि लेखक आहे. अमेरिकेमध्ये रस्ते अपघातामध्ये नवीन पॉलिशेट्टी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवीन पॉलिशेट्टीच्या अपघाताची माहिती कळताच त्याचे चाहते चिंतेत आले आहेत.

2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुशांत सिंग राजपूत स्टारर 'छिछोरे' या चित्रपटामध्ये नवीन पॉलिशेट्टीने सुशांतचा मित्र अ‍ॅसिडची भूमिका साकारली होती. आपल्या व्यक्तिरेखेने त्याने सर्वांची मने जिंकली. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, नवीन पॉलशेट्टी अमेरिकेतील डलासच्या रस्त्यावर बाईक चालवत असताना अपघात झाला. बाईक चालवत असताना त्याचा तोल गेला आणि तो जोरात रस्त्यावर पडला. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला फॅक्चर झाले आहे. सध्या अमेरिकेतील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

'छिछोरे' अभिनेत्याच्या अपघातावर नवीन पॉलिशेट्टी किंवा त्याच्या टीमकडून सध्या कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. नवीन पॉलिशेट्टीने चित्रपटांसोबतच टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. नवीन पॉलिशेट्टीने 2012 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. त्याने अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.

प्रमुख अभिनेता म्हणून नवीनने 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एजंट साई श्रीनिवास अथरेया' या तेलुगू चित्रपटामध्ये काम केले. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला दक्षिणेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

नवीन पॉलिशेट्टीने तेलुगू चित्रपटासोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. 2019 मध्ये त्याने 'छिछोरे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटामध्ये त्याने 'ॲसिड' म्हणजेच हिमांशूची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तो सुशांतचा चांगला मित्र दाखवला होता.

Naveen Polishetty Bike Accident In US
Crew Twitter Review: करीना-क्रिती आणि तब्बूच्या 'क्रू'ने जिंकलं प्रेक्षकांचे मन, कथा-संवाद आणि अभिनयाला फुल मार्क्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com