बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) नुकताच राजकारणामध्ये एन्ट्री घेतली. कंगनाला भाजपकडून (BKP) उमेदवारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) मंडी मतदार संघातून कंगनाला भाजपने तिकीट दिलं आहे. कंगनाला भाजपकडून उमेदवार म्हणून घोषणा केल्यापासून ती चांगलीच चर्चेत आहे. अशामध्ये काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी कंगना रनौतसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले. ज्यावर कंगना रनौतने पलटवार केला आहे. याचदरम्यान कंगनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर वादग्रस्त विधान केले होते.
कंगना रनौतचा व्हायरल होणारा व्हिडीओ २०२० मधील आहे. ज्यामध्ये कंगना रनौतने एका न्यूज चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये ती म्हणते की, 'मी उर्मिता मातोंडकरची एक खूपच अपमानास्पद मुलाखत पाहिला. ती ज्यापद्धतीने माझ्याबद्दल बोलत होती, माझी मस्करी करत होती, माझ्या संघर्षाची खिल्ली उडवत होती. मी तिकीटासाठी भाजपला खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा माझ्यावर आरोप करत होती.'
कंगना या व्हिडीओमध्ये पुढे म्हणाली की, 'माझ्यासाठी तिकीट मिळवणे फार कठीण नाही हे समजून घेण्यासाठी प्रतिभावान असण्याची गरज नाही. उर्मिला एक सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. ती तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते? ते म्हणजे सॉफ्ट पॉर्नसाठी. जर तिला तिकीट मिळत असेल तर मला तिकीट का नाही मिळणार?'
आता कंगना रनौतला तिकीट मिळाल्यानंतर सुप्रिया श्रीनेत यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर कंगनाचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले - 'कोणी सांगू शकेल का की मंडीमध्ये काय भाव चालला आहे?' काँग्रेस नेत्या सुप्रिया यांच्या या पोस्टनंतर एकच खळबळ उडाली. कंगना रनौतने यावर सुप्रिया श्रीनेत यांना उत्तर दिलं आहे.
कंगना रनौतने आपल्या अधिकृत एक्स म्हणजेच ट्विटर अकाऊंटवरून सुप्रिया श्रीनेत यांच्या पोस्टला उत्तल दिलं आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'एक कलाकार म्हणून माझ्या गेल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत मी सर्व प्रकारच्या महिलांच्या भूमिका साकारल्या आहेत. 'क्वीन'चित्रपटामधील एका निष्पाप मुलीपासून ते 'धाकड'मधील एका आकर्षक गुप्तहेरपर्यंत, 'मणिकर्णिका'मधील देवीपासून 'चंद्रमुखी'मधील राक्षसापर्यंत, 'रज्जो'मधील वेश्यापासून 'थलायवी'मधील क्रांतिकारक नेत्यापर्यंत.'
कंगनान या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, 'आपण आपल्या मुलींना पूर्वग्रहांच्या बंधनातून मुक्त केले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण लैंगिक कामगारांचं जीवन किंवा परिस्थितीला अत्याचार किंवा अपमान म्हणून वापरण्यापासून परावृत्त केले पाहिजे. प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानास पात्र आहे.' कंगना रनौतची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.