Jeetendra Birthday: एअर होस्टेसच्या प्रेमात झाले होते वेडे, पत्नीच्या एका निर्णयामुळे वाचला जितेंद्र यांचा जीव

Jeetendra Kapoor Filmy Career: ६० ते ९० च्या दशकात त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट देत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्या काळामध्ये ते बॉलिवूडचे टॉप अभिनेते होते. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. त्यांनी आपल्या दमदार अभिनय आणि स्टाइलने प्रेक्षकांची मनं जिंकली.
Jeetendra Kapoor Birthday Sapecial
Jeetendra BirthdaySaam Tv

Jeetendra Bday Special:

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र (Jeetendra) आज आपला ८२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. जितेंद्र यांना बॉलिवूडचे जंपिंग जॅक म्हणून ओळखले जाते. ६० ते ९० च्या दशकात त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट देत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्या काळामध्ये ते बॉलिवूडचे टॉप अभिनेते होते. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. त्यांनी आपल्या दमदार अभिनय आणि स्टाइलने प्रेक्षकांची मनं जिंकली. जितेंद्र यांचा आज वाढदिवस असून चाहते आणि सेलिब्रिटींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. जितेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांच्या फिल्मी करिअर आणि पर्सनल लाइफविषयी जाणून घेणार आहोत...

जितेंद्र यांची लव्हस्टोरी -

ब्रिटीश एअेरवेजमध्ये एअर होस्टेस असलेल्या शोभा कपूर यांच्याशी त्यांनी लग्न केले. दोघांची लव्हस्टोरी फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हती. शोभा अवघ्या 14 वर्षांची असताना त्यांची जितेंद्र यांच्याशी भेट झाली. दोघेही पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, यानंतर दोघेही वेगळे झाले आणि त्यांच्या आयुष्यात पुढे गेले. शोभा एअर होस्टेस बनल्या तर जितेंद्र त्याच्या चित्रपटांमध्ये व्यस्त झाले. या काळात जितेंद्र यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. हेमा मालिनी आणि जितेंद्र यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. पण धर्मेंद्र मध्येच आले.

धर्मेंद्र यांनी जितेंद्र आणि शोभा यांना एकत्र आणलं -

जितेंद्र आणि शोभा यांना एकत्र आणण्यात धर्मेंद्र यांचा मोठा वाटा असल्याचं देखील सांगितलं जातं. जितेंद्रचे कुटुंबीय शोभासोबत लग्नासाठी तयार नव्हते. एकीकडे वैयक्तिक आयुष्यात अडचणी होत्या. तर दुसरीकडे जितेंद्रचे चित्रपटही काही विशेष कामगिरी करत नव्हते. पण बऱ्याच संघर्षानंतर त्यांचा 'बिदाई' हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर 31 ऑक्टोबर 1974 रोजी त्यांनी शोभासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांची मुलगी एकता कपूर टीव्ही मालिकांची निर्माती आहे आणि त्यांचा मुलगा तुषार कपूर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनेता बनला.

बायकोमुळे वाचला जितेंद्र यांचा जीव -

जितेंद्रने 'द कपिल शर्मा शो'मध्ये एका घटनेचा खुलासा केला होता. ही घटना 1976 ची आहे. जितेंद्र यांना विमानाने चेन्नईला जायचे होते. त्या दिवशी करवा चौथचा उपवास होता. त्यांच्या फ्लाइटला उशीर झाला म्हणून ते घरी आले जेणेकरुन त्याची बायको तिचा उपवास सोडू शकेल. त्यानंतर काही वेळाने ते परत चेन्नईला जाण्यासाठी निघत होते. पणे शोभा यांनी त्यांना एअरपोर्टवर जाण्यास नकार दिला. यानंतर जितेंद्र यांनी आपल्या टीमला दुसऱ्या दिवशी चेन्नईला जाणार असल्याचे सांगितले. जितेंद्र यांनी पुढे सांगितले की, त्याच रात्री 11 च्या सुमारास त्यांनी त्याच्या फ्लॅटच्या बाहेर एक विचित्र दृश्य पाहिले. त्यांना आगीच्या गोळ्यासारखे काहीतरी एअरपोर्टच्या दिशेने जाताना दिसले. काही तासांनी त्याचा फोन आला. तेव्हा त्यांना कळले की, ज्या विमानाने त्यांना चेन्नईला जायचे होते ते विमान क्रॅश झाले होते. या घटनेमध्ये 96 लोकांचा मृत्यू झाला होता.

Jeetendra Kapoor Birthday Sapecial
Family Star Day 2 Collection: 'फॅमिली स्टार'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, दुसऱ्या दिवशी दिलासादायक प्रतिसाद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com