Anil Kapoor Fitness: ‘दोन्हीही भूमिकेंसाठी ट्रान्सफोर्मेशन करणं सोप्पं नव्हतं...’; ‘मिस्टर इंडिया’ चा फिटनेस फ्रिक लूक पाहिलात का?

Anil Kapoor Photos: अनिल कपूर यांनी आपल्या फिटनेसबद्दल चाहत्यांसोबत एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Anil Kapoor Fitness Freak Photos
Anil Kapoor Fitness Freak PhotosInstagram
Published On

Anil Kapoor Fitness Freak Photos

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर ६६ वर्षांचे आहेत. मात्र, या वयातही अनिल कपूर यांचा फिटनेस अनेकांना लाजवेल असा आहे. अनिल कपूर यांनी फिटनेसमुळे सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अनिल कपूर यांना पाहून त्यांच्या वयाचा अजिबात अंदाज लावता येत नाही.

अनिल नेहमीच आपल्या स्टाईलमुळे आणि उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकतात. येत्या १ डिसेंबरला अनिल कपूर यांचा ‘ॲनिमल’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच अनिल कपूर यांनी आपल्या फिटनेसबद्दल चाहत्यांसोबत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Anil Kapoor Fitness Freak Photos
Indian 2 Poster: कमल हसन यांच्या ‘इंडियन’चा २७ वर्षांनी सिक्वेल येणार, वाढदिवसाआधीच अभिनेता चाहत्यांना देणार गिफ्ट

सध्या अनिल कपूर त्यांच्या दोन चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत आहेत. लवकरच अनिल कपूर यांचे ‘ॲनिमल’ आणि ‘फायटर’ हे दोन चित्रपट येणार आहेत. दोन्हीही चित्रपटामध्ये अनिल यांची फिटनेस फार वेगळी आहे. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर एक शर्टलेस फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये, अनिल कपूर यांनी एकाच वेळी दोन भूमिका साकारताना फिटनेसकडे किती लक्ष केंद्रित केले पाहिजे, याचे महत्व शेअर केले आहे. ‘ॲनिमल’मध्ये ६५ वर्षीय बलबीरचे पात्र साकारत आहे, तर ‘फायटर’मध्ये ४५ वर्षीय एअरफोर्स फायटर रॉकीचे पात्र साकारले आहे.

आपल्या पोस्टमध्ये अनिल कपूर म्हणतात, “शूटिंगच्या वेळी दोन पूर्णपणे विरुद्ध भूमिकांमध्ये बदल करणे आव्हानात्मक आणि समाधानकारक दोन्ही होते. या दोन्ही भूमिकेंसाठी मला फिटनेसकडे खूप लक्ष द्यावे लागले. त्यामुळे मी दोन्हीही पात्रांना योग्य न्याय देऊ शकलो. आता दोन्ही चित्रपटांचे शूटिंग पूर्ण झाले आहेत. प्रेक्षक माझे दोन्हीही चित्रपट कधी पाहतील या दिवसाची मी वाट पाहतोय. ”

Anil Kapoor Fitness Freak Photos
The Lady killer Trailer: अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकरची रोमँटिंक केमिस्ट्री पाहिलीत का?; 'द लेडी किलर'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

अनिल कपूरच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसोबत चाहतेही प्रतिक्रिया देताना दिसत आहे. वरुण धवण सह सोनम कपूरनेही प्रतिक्रिया दिली आहे. अनिल कपूर शेवटचे 'द नाईट मॅनेजर' या वेब सीरीजमध्ये दिसले होते. या वेब सीरिजमध्ये त्याच्यासोबत आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला मुख्य भूमिकेत होते. ही वेब सीरीज प्रचंड हिट झाली असून कलाकारांचे प्रचंड कौतुक होत आहे.

Anil Kapoor Fitness Freak Photos
Prakash Raj On Tejas Film: ‘तुम्ही थांबा, तुमचा चित्रपट लवकरच...’; प्रकाश राज यांनी कंगना रनौतचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत उडवली खिल्ली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com