The Lady killer Trailer
The Lady killer TrailerSaam Tv

The Lady killer Trailer: अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकरची रोमँटिंक केमिस्ट्री पाहिलीत का?; 'द लेडी किलर'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

The Lady killer Trailer Released: अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांचा 'द लेडी किलर' या धडाकेबाज चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Published on

Bhumi Pednekar And Arjun Kapoor Film

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच त्यांचा 'द लेडी किलर' या धडाकेबाज चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ट्रेलरमध्ये, सुरूवातीलाच अर्जुन कपूर डॅशिंग अंदाजात एन्ट्री करताना पाहायला मिळत आहे. कामानिमित्त एका दुसऱ्या शहरात राहायला गेल्यावर अर्जुन जेव्हा तेथे एका मुलीला भेटतो आणि पुढे दोघे एकमेकांसोबत संपर्कात राहतात आणि पुढे दोघांच्या रोमँटिंक केमिस्ट्रीला सुरूवात होते.

अर्जुन कपूरचा हा हटके लूक सर्वांचेच लक्ष वेधत आहे. याचवेळी भूमीदेखील त्याला तगडी टक्कर देताना दिसतेय. ट्रेलर पाहिल्यानंतर अर्जुन आणि भूमीच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.

'द लेडी किलर' चित्रपटाचा ट्रेलर अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रोमॅन्टिक आणि सस्पेन्स ड्रामा पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे. अजय बहल दिग्दर्शित 'द लेडी किलर' चित्रपट येत्या २ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

The Lady killer Trailer
Prakash Raj On Tejas Film: ‘तुम्ही थांबा, तुमचा चित्रपट लवकरच...’; प्रकाश राज यांनी कंगना रनौतचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत उडवली खिल्ली
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com