November Month 1st Week Release Movie: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झालेले बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत पिछाडीवर आहेत. प्रेक्षकांना चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा अभिनय पसंतीस आला नाही. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला अजय देवगणचा 'थँक गॉड' आणि अक्षय कुमारचा 'राम सेतू' हे दोन्ही चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर आपला एक आठवडा पूर्ण करणार आहेत आणि दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी कमाई करण्यासाठी अपयशी ठरले आहेत.
या चित्रपटांना आधीच कमाई करणे कठीण जात असताना, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांना टक्कर देण्यासाठी एकाच वेळी अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्यामध्ये हॉरर, कॉमेडीसोबतच रोमान्स आणि अॅक्शनही पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊया, या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संपूर्ण यादी.....
बॉलिवूडमध्ये जबरदस्त चुरस रंगणार
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक, दोन नाही सात चित्रपट हिंदी भाषेत थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. त्यापैकी दोन बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे मुख्य अभिनय असलेले चित्रपट कतरिना कैफ, इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा हॉरर कॉमेडी 'फोन भूत' आणि दुसरा सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीचा 'डबल एक्सएल' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय जान्हवी कपूरचा 'मिली', 'कुट्टे', 'धूप छां' आणि 'रामराज्य' हे चित्रपटही ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहेत.
मराठीतील पाच चित्रपट
हा आठवडा मराठी चित्रपट प्रेमींसाठीही खास असणार आहे. 'मन कस्तुरी रे', 'प्रेम प्रथम धुमशान', '36 बंदुका', 'प्रेम म्हणजे काय असतं' आणि 'पलाद' हे चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.
तेलुगू चित्रपटांचीही लागणार रिघ
हा आठवडा तेलुगु सिनेमासाठी खूप खास असणार आहे. या आठवड्यात ४ नोव्हेंबर रोजी 'उर्वसिवो रक्षासिवो', 'मिस्टर तारक', 'साराधी', 'अकाश्म', 'लाइक, शेअर अॅन्ड सबस्क्राईब' सोबतच 'जेट्टी' सिनेमाही चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मल्याळम चित्रपटांची एकमेकांमध्ये चुरस
मल्याळम चित्रपटसृष्टीत या आठवड्यात चार चित्रपट एकत्र प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच मल्याळम प्रेक्षकांसाठी हा आठवडा खूप चांगला जाणार आहे. 'सॅटर्डे नाईट', 'बनारस', 'कूमन' आणि 'एलम सेटनू' हे 4 नोव्हेंबरला रिलीज होत आहेत.
तमिळ भाषेत येणार खास चित्रपट
या आठवड्यात तमिळ भाषेतील दोन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये 'निथम ओरू वनामी' आणि 'लव्ह टुडे' या नावांचा समावेश आहे. हे दोन्ही चित्रपट ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.
कन्नड चित्रपट
या आठवड्यात कन्नड भाषेतील 'बनारस' हा रोमँटिक चित्रपट आहे असून दुसरा 'कांबलीहुला' चित्रपट आहे. हे दोन्ही चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहेत. बनारस चित्रपटहा एकाचवेळी कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेत एकाचवेळी प्रदर्शित होणार आहे.
पंजाबी चित्रपट
या आठवड्यात पंजाबी चित्रपट एकच प्रदर्शित होणार आहे. 'ओये मखना' हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून चित्रपटात एमी विर्क मुख्य भूमिकेत आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.