Adipurush Postponed: प्रभासचा बिग बजेट चित्रपट 'आदिपुरुष' लांबणीवर, नेमके कारण काय?

बॉक्स ऑफिसवर प्रभास स्टारर 'आदिपुरुष'ला टक्कर देण्यासाठी थलपथी विजयचा 'वारीसू' चित्रपट सुद्धा प्रदर्शित होणार आहे.
Adipurush Movie Release Postpone
Adipurush Movie Release PostponeSaam Tv
Published On

Adipurush News Update: प्रभास आणि सैफ अली खानचा 'आदिपुरुष' हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर केली जात आहे. आता हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार नसून 2023 च्या उन्हाळ्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, असेही म्हटले जात आहे. परंतु निर्मात्यांनी एवढा मोठा निर्णय का घेतला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मकर संक्रांतीच्या आठवड्यात 'आदिपुरुष' चित्रपट प्रदर्शित होणार आहे, त्याच आठवड्यात साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा 'वाल्टेयर वीरय्या' आणि नंदामुरी बालकृष्णन स्टारर 'वीरा सिम्हा रेड्डी' देखील प्रदर्शित होणार आहेत. इतकंच नाही तर बॉक्स ऑफिसवर प्रभास स्टारर 'आदिपुरुष'ला टक्कर देण्यासाठी थलपथी विजयचा 'वारीसू' चित्रपट सुद्धा प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत 'आदिपुरुष'ला आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये योग्य प्रतिसाद आणि स्क्रीन मिळणार नाही, अशी भीती निर्मात्यांना वाटत आहे. (Movie)

Adipurush Movie Release Postpone
Atul Virkar: कलाकाराची अनोखी शक्कल; संकटाला तोंड देण्यासाठी खास चहाची टपरी

२ ऑक्टोबरला अयोध्येत चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपटाला त्याच्या व्हीएफएक्समुळे खूप ट्रोल करण्यात आले. सोशल मीडियावर युजर्सनी 'रावण'च्या लूकची खिल्ली सुद्धा उडवली. या चित्रपटात दाखवले जाणारे व्हीएफएक्स अतिशय वाईट असल्याचेही लोकांनी म्हटले आहे. लोकांनी चित्रपटाच्या वीएफएक्सची तुलना टेम्पल रन गेमशी केली आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये सैफ अली खानचा रावण, हनुमान, भगवान राम आणि सीता यांची भूमिका अयोग्य पद्धतीने दाखवण्यात आली आहे. यामुळे निर्माते चित्रपटात मोठे बदल करण्यास वेळ घेत आहेत असे म्हटले जात आहे. (Social Media)

'आदिपुरुष' हा बॉलिवूडचा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचे बजेट 500 कोटी आहे. प्रभाससोबत क्रिती सेनॉन आणि सनी सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. यापूर्वी ओम राऊत यांनी तानाजीसारखा सुपरहिट चित्रपट केला आहे. (Bollywood)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com