Atul Virkar: कलाकाराची अनोखी शक्कल; संकटाला तोंड देण्यासाठी खास चहाची टपरी

अनेक मालिकांमध्ये साईड ॲक्टर म्हणून भूमिका साकारलेल्या अतुल विरकर ने ही आता स्वत:चा छोटा व्यवसाय सुरू केला आहे. एका छोट्या व्हॅनमध्ये चहाच्या टपरीचा नुकताच त्याने श्रीगणेशा ही केला.
Atul Virkar Viral Post
Atul Virkar Viral PostFacebook/ @Atul Virkar

Atul Virkar: अनेकदा आपला गोड गैरसमज असतो, सिनेसृष्टीत काम करतो म्हणजे हा बक्कळ पैसा कमवतो. खरच आपला हा समज खूप चुकीचा असतो. सध्या वैश्विक कोरोना महामारीने सर्वांचेच आर्थिक गणित बिघडले होते. त्यामुळे प्रत्येकाप्रमाणे या क्षेत्रातील मंडळींनाही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले.

मालिकेतील कलाकार दिवसातील बराचवेळ शूटिंगमध्येच घालवतात. इतके काम करूनही त्यांचे मानधन जवळपास तीन महिन्यांनंतर मिळते. त्यांचा हा प्रश्न बऱ्याचदा अनेक ठिकाणी मांडला होता. पण अद्यापही हा प्रश्न सुटलेला नाही.

Atul Virkar Viral Post
Bigg Boss Marathi 4: घरात स्पर्धकांसोबत योगेशला असभ्य वर्तवणूक पडले महागात, बिग बॉसच्या घराला करावे लागले बाय बाय

यामुळे सर्वात जास्त हाल होतात ते दुय्यम श्रेणीत काम करणाऱ्या कलाकारांचे. काम आणि मानधनाच्या अनिश्चिततेमुळे त्यांच्या कुटुंबांचेही आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. कितीही समस्या समोर आल्या तरी कलाकार कधी हार मानत नाहीत. अनेक कलाकार सध्या विविध क्षेत्रात काम करताना दिसत आहेत.

कुणी भाजीचा व्यवसाय करतोय, कुणी रिक्षा चालवतोय. अनेक मालिकांमध्ये साईड ॲक्टर म्हणून भूमिका साकारलेल्या अतुल विरकर ने ही आता स्वत:चा छोटा व्यवसाय सुरू केला आहे. एका छोट्या व्हॅनमध्ये चहाच्या टपरीचा नुकताच त्याने श्रीगणेशा ही केला.

Atul Virkar Viral Post
Ram Charan: परदेशात रामचरणचे स्पेशल अॅडवेंचर; व्हिडिओ चर्चेत

नवीन कामाविषयी त्याने फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट करत माहिती शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तो म्हणतो, माझा नवीन व्यवसाय अनेक दिवसांपासून सुरु केलाय. आज त्याची यथासांग पूजा गुरूजींच्या हस्ते केली. अडचणी खूप आल्या आणि त्यावर मात करायची आहे. महागाई, जागतिक मंदी आणि ह्या सगळ्याला तोंड द्यायचे होते. त्यात प्रियांशच खर्च आणि घरातला खर्च..हे सगळं एकंदरीत मला बघता काही तरी धडपड करायची होती. स्वतःचं अस्तित्व तयार करायचं होतं.

तसेच तो पुढे म्हणतो, मग भांडवल कसं जमवायचं. मी आणि माझी पत्नी सोनलनं आपण लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल याची कल्पना सुचवली. लोकांपर्यंत पोहोचायचा सोपा मार्ग म्हणजे चहा. कमी भांडवल आणि छान टेस्ट कशी देता येईल. बाजारात स्पर्धा तर आहेच. पण त्यातून कसा आपण चांगला चहा करून ह्या कडे लक्ष द्यायचंय.

अतुल ला एक मुलगा आहे. सध्या तो जी काही धावपळ करतोय त्या लाडक्या लेकासाठी. ज्या वयात बाळ दुडूदुडू पाळायला लागते, तुटके तुटके शब्द बोलायला लागतो त्या वयात अतुलचा मुलगा प्रियांश स्वतःच्या शरीरावर ताबा मिळवण्यासाठी झटत आहे. प्रियांशला 'अलन हार्नडन ड्युडली सिन्ड्रोम' या दुर्मिळ आजारानं ग्रासले आहे.

त्याच्या जन्मापासूनच तो मान पकडत नाही. त्याला पहिल्या काही महिन्यांमध्येच फिट्स येणे, वजन कमी असणे हा त्रास सुरू झाला. हार्मोनल असंतुलनाने प्रियांशचा त्याच्या शरीरावर ताबा नाही. प्रियांशच्या आजारावरील वर्षभराचा खर्च किमान दहा लाख इतका आहे. त्यामुळे लोकांनी केलेली मदत आता पुरेशी होणार नाही. त्या तुटपुंज्या खर्चावर आपले घर चालणार नाही हे ठाऊक असून त्याने आपला नवा व्यवसाय सुरू केला.

त्याने अनेक हिंदी मालिका, मराठी चित्रपटांमधून लाडक्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com