Sai Tamhankar: मराठमोळी सई ताम्हणकर पुन्हा बॉलिवूडमध्ये झळकणार

सईचा मिमीनंतर पुन्हा एकदा नवा बॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'इंडिया लॉकडाऊन' असं सईच्या नव्या सिनेमाचे नाव आहे.
Sai Tamhankar
Sai TamhankarInstagram/@saietamhankar

India Lockdown Poster Out: मराठमोळी लेक आणि पाश्चिमात्य कपड्यांचा लूक करणारी मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. फक्त मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या कामाचा डंका वाजवणारी ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

बॉलिवूडमध्ये सईने 'हंटर' चित्रपटातून पदार्पण केले होते. तिने बॉलिवूड पदार्पणानंतर मराठी सिनेसृष्टीत म्हणावे इतके काम केले नाही. सईचा सर्वाधिक चित्रपट गाजला तो, 'मिमी'. 'मिमी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही तिला मिळाला होता.

Sai Tamhankar
Bigg Boss Marathi 4: स्नेहलता घरात येताच स्पर्धकांमध्ये उभी फूट, दोन-तीन गट पडले

नुकतीच सईची एक चांगल्या विषयावर आधारित मराठी वेबसीरिजही प्रदर्शित झाली होती. 'बी ई रोजगार' या वेबसीरिजमधून अस्सल नागपुरी तडका दिला आहे. सध्या सई 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम पाहत आहे.

तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना गुड न्युज शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधुन घेतले आहे. सई बऱ्याचदा बॉलिवूडमधील कलाकारांच्या संपर्कात असल्याने ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

Sai Tamhankar
Hrithik Roshan Saba Azad: हृतिक रोशनने दिल्या गर्लफ्रेंड सबा आझादला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

नुकतेच काही दिवसांपुर्वी कलाकारांसह त्यांच्या चाहत्यांनीही दिवाळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली. सईनेही दिवाळी पार्टीमध्ये जात खास फोटो शेअर केले होते. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननसोबत सई पुन्हा एकदा दिसली.

गेल्या काही दिवसांमध्ये सई क्रितीसोबत दिसली आहे. सईने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवाळीनंतर आपल्या चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले असून त्या गिफ्टची बरीच चर्चा होत आहे. सईचा मिमीनंतर पुन्हा एकदा नवा बॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Sai Tamhankar
Katrina Kaif Halloween Costume: बायकोच्या हॅलोवीन फोटोशूटसाठी विकी बनला दिग्दर्शक, व्हिडिओ तुफान व्हायरल

'इंडिया लॉकडाऊन' असं सईच्या नव्या सिनेमाचे नाव आहे. इंडिया लॉकडाऊन या सिनेमाच्या नावावरूनच हा सिनेमा जगात आलेल्या कोरोना महामारीमुळे करावा लागलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीवर भाष्य करणार असल्याचे दिसत आहे. पहिल्यांदाच सई एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. नो मेकअप, नो बोल्ड लूक तर साध्या साडीमध्ये सई दिसून येत आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रतीक बब्बर, प्रकाश बेलवडी, श्वेता बसू प्रसाद आणि आहाना कुमराहे हे कलाकार दिसणार आहेत.

खऱ्या आयुष्यात जसा प्रत्येकाला लॉकडाऊनचा फटका बसला तसाच फटका यांनाही बसलेला दिसत आहे. कोरोना महामारीवर आधारित 'इंडिया लॉकडाऊन' चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर आहेत. त्यांनी यापुर्वी बॉलिवूडला दमदार चित्रपट दिले आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नसून चित्रपटाचे प्रिमीयर २ डिसेंबरला होणार आहे. हा चित्रपट Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

Edit By: Chetan Bodke

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com