Drishyam 2 Trailer Out : यावेळी विजय साळगावकर पोलिसांना चकवा देणार का? ट्रेलर पाहून येईल अंदाज

अजय देवगण आणि तब्बू यांचा बहुप्रतीक्षित 'दृश्यम 2' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Drishyam 2
Drishyam 2Saam Tv
Published On: 

मुंबई: अजय देवगण आणि तब्बू यांचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट (Movie) 'दृश्यम'चं प्रेक्षकांच्या मनात स्थान आहे. तसेच या चित्रपटाने प्रेक्षकांना विचार कार्याला भाग पाडले. तब्बल सात वर्षांनी पुन्हा एकदा विजय साळगावकर यांचे प्रकरण उघड होणार आहे. 'दृश्यम 2'ची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटातील तब्बू आणि अक्षय खन्ना यांचे पोस्टर्स समोर आले आहेत. याशिवाय 2 ऑक्टोबरला चित्रपटाचा रिकॉल ट्रेलर (Trailer) रिलीज झाला होता. आता चाहत्यांची उत्सुकता कायम ठेवत निर्मात्यांनी 'दृश्यम 2' (Drishyam 2) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. सस्पेन्सने भरलेल्या या ट्रेलरमध्ये अजय देवगण यावेळी पोलिसांच्या तावडीत अडकणार असे दिसत आहे.

Drishyam 2
Manva Naik: मनवा नाईकच्या मदतीला धावून आले मुंबई पोलीस, विश्वास नांगरे पाटील यांची कमेंट चर्चेत

2 मिनिट 24 सेकंदाचा हा ट्रेलर सस्पेन्सने भरलेला आहे. 7 वर्षांनंतर 2 ऑक्टोबरला घडलेली ही कथा 'दृश्यम 2'च्या माध्यमातून पुढे सरकत आहे. ट्रेलरची सुरुवात अजय देवगणच्या विजय साळगावकरच्या भूमिकेने होत आहे. तसेच त्याने तब्बूच्या मुलाचा मृतदेह जिथे पुरला त्याच ठिकाणी ट्रेलरचा शेवट सुद्धा होतो. 7 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. पण यावेळी विजयच्या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी अक्षय खन्नाच्या (Akshaye Khanna) खांद्यावर आहे. ट्रेलरमध्ये अक्षय खन्ना अजय देवगण आणि त्याच्या कुटुंबासोबत माइंड गेम्स खेळताना दिसत आहे.

'दृश्यम'मधील अजय देवगणची (Ajay Devgan) व्यक्तिरेखा लोकांना जितकी आवडली तितकीच तब्बूची भूमिकाही लोकांना आवडली. 'दृश्यम 2' मध्ये तब्बू एका आईप्रमाणे पोलिस अधिकाऱ्यासाठी नव्हे तर आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी लढताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये तब्बू यावेळी नेहमीपेक्षा अधिक स्ट्रॉंग दिसत आहे. ट्रेलरप्रमाणे हा चित्रपट अजिबात सरळ नसून प्रचंड सस्पेन्स भरला आहे.

अजय देवगण स्टारर चित्रपट 'दृश्यम 2' पुढील महिन्यात 18 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू (Tabu) आणि अक्षय खन्ना यांच्याशिवाय श्रीया सरन, इशिता दत्ता आणि रजत कपूर हे महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. 'दृश्यम 2'चे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com