Dream Girl 2 Trailer: ‘पूजा’च्या समोरची आव्हाने वाढली, ‘ड्रीम गर्ल २’चा ट्रेलर पाहून पुन्हा हास्यकल्लोळ होणार

Dream Girl 2 Trailer Release: राज शांदिल्या दिग्दर्शित ‘ड्रीम गर्ल २’चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
Dream Girl 2 Trailer
Dream Girl 2 TrailerInstagram

Ayushman Khurana And Ananya Pandey Film Trailer Release: राज शांदिल्या दिग्दर्शित ‘ड्रीम गर्ल २’ (Dream Girl 2) ची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. नुकताच चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अखेर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. येत्या २५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तब्बल चार वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा एकदा पूजाला पाहून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल फारच उत्सुकता आहे.

Dream Girl 2 Trailer
Raqesh Bapat Share Video: शूटिंगदरम्यान अभिनेता राकेश बापटची प्रकृती बिघडली; दुबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत असलेला ‘ड्रीम गर्ल’चा सिक्वेल २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तब्बल चार वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर ‘ड्रीम गर्ल २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा पूजा या पात्राभोवती फिरत आहे. नेमके हे पात्र आयुष्मान साकारत असून त्याने स्त्रीवेश परिधान करून हे पात्र साकारले आहे. ड्रीम गर्लने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमावला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्यानंतर आता प्रेक्षकांना ‘ड्रीम गर्ल २’ कडूनही बऱ्याच अपेक्षा आहेत.

नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सध्या ट्रेलरची सर्वत्र कमालीची चर्चा सुरू आहे. ट्रेलरच्या सुरूवातीला, आयुष्मानचे वडील घरात उगाचच नाही तो खर्च करून आपल्या अंगावर कर्ज वाढवतात. तर दुसरीकडे आयुष्मानचं ज्या मुलीवर प्रेम झालेलं आहे, तिच्या वडीलांनी आयुष्मानसमोर लग्नाआधी एक विचित्र अट ठेवलेली दिसत आहे. लग्नाच्यााआधी आयुष्मानला एक चांगल्या पगाराची नोकरी आणि सहा महिन्याच्या आत बँक खात्यात २५ लाख रूपये जमा केले तरच त्यांचे लग्न होईल.

Dream Girl 2 Trailer
Ved World Television Premiere: श्रावणी आणि सत्याची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘वेड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार

मुलीच्या वडीलांनी आपल्या समोर ठेवलेली अट पाहता, त्याचे मित्र त्याला एक अनोखी शक्कल देतात. आयुष्मानच्या घरातील आर्थिक परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नसते. त्यामुळे आयुष्मानला त्याच्या मित्रांनी पुन्हा पूजाचा लूक घेऊन डान्स बारमध्ये काम करायला सांगतात. पूजा बारमध्ये काम करत असताना तिथे तिच्या प्रेमात एक श्रीमंत घरातील मुलगा पडतो. लग्नासाठी त्याच्या घरातील कुटुंबीय ५० लाख रुपये द्यायला तयार होतात. चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना “ट्राफिक जॅम होणार कारण चार वर्षांनी ड्रीम गर्ल पूजा येणार…” अशा आशयाचे कॅप्शन आयुष्मानने दिले आहे.

Dream Girl 2 Trailer
Kiran Mane Post: “मी तिचा 'फॅन' होतो, जिच्यावर अक्षरश: 'क्रश' होता”; किरण मानेंनी दिल्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा

चित्रपटात प्रमुख भूमिकेत आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे सोबत परेश रावल, असरानी, राजपाल यादव, मनजोत सिंग आणि अनु कपूरसारख्या दमदार कलाकारांची फौज चित्रपटात दिसणार आहे. चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्षित होणार असून अनेकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाला आहे. यापूर्वी चित्रपट २५ जुलैला रिलीज होणार होता पण काही कारणास्तव निर्मात्यांनी तारीख बदलली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com