Adipurush 2nd Day Collection: विरोध होऊनही ‘आदिपुरूष’ची यशस्वी घोडदौड, चित्रपटाने कमावला इतक्या कोटींंचा गल्ला

Adipurush Box Office Collection: जगभरात ‘आदिपुरूष’ने बॉक्स ऑफिसवर १५१ कोटींची कमाई केली आहे.
Adipurush 2nd Day Collection
Adipurush 2nd Day CollectionInstagram/ @actorprabhas
Published On

Adipurush 2nd Day Box Office Collection: रामायणावर आधारित असलेल्या ‘आदिपुरूष’ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन नुकतेच दोन दिवस झाले असून चित्रपटावर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली. चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान, सनी सिंह आणि देवदत्त नागे हे कलाकार आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच ओपनिंग घेतली असून, आतापर्यंत जगभरात १५१ कोटींची कमाई केली आहे. 

Adipurush 2nd Day Collection
Bigg Boss OTT 2 1st Elimination : बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं, 'या' स्पर्धकाला 12 तासांतच घरातून काढलं बाहेर

Sacnilk च्या मते, प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाने एकट्या भारतात ६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हिंदी भाषेत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांत ३७ कोटींच्या कलेक्शनसह चांगली कामगिरी करत आहे. तर तेलुगू भाषेमध्ये ‘आदिपुरूष’ने दुसऱ्या दिवशी २६ कोटी इतके कलेक्शन जमवले आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून चित्रपटावर अनेक प्रेक्षकांनी सडकून टिका केली होती. चित्रपटाला नेटकऱ्यांनी व्हिएफएक्स, पात्रांचे लूक्स आणि संवादामुळे तुफान ट्रोल केले होते. छत्तीसगडच्या भरतपूर जिल्ह्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर राष्ट्रीय बंदी घालण्याची मागणी करत निदर्शने करण्यात आले होते. तथापि, संमिश्र प्रतिक्रिया असूनही, चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

Adipurush 2nd Day Collection
The Archies Teaser: स्टार किड्स असलेल्या ‘द आर्चिज’चा टीझर प्रदर्शित, लव्ह- ब्रेकअपचं कॉकटेल अन् रेट्रो लूकच्या प्रेमात पडाल

जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत, आदिपुरुषची पहिल्या दिवसाची कमाई चौथ्या स्थानावर आहे. 222 कोटी रुपयांसह 'RRR', 214 कोटी रुपयांसह 'बाहुबली 2: द कन्क्लुजन' आणि 164.5 कोटी रुपयांसह 'KGF: चॅप्टर 2' या यादीतील टॉप तीन चित्रपट आहेत. तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी १२५ कोटीची कमाई केली होती.

Adipurush 2nd Day Collection
Alia Bhatt Debut Movie Trailer Out: हिरोईन नव्हे व्हिलन.. पहिल्यांदाच खलनायिका झालेल्या आलियाचा रावडी अंदाज; हार्ट ऑफ स्टोनचा ट्रेलर प्रदर्शित

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपटाची कथा पौराणिक कथेवर आधारित आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रभास प्रभु श्री रामांच्या, क्रिती सेनन माता जानकीच्या तर, सनी सिंग लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोबतच देवदत्त नागे हनुमानाच्या तर, सैफ अली खान रावणाची व्यक्तीरेखा साकारतोय. चित्रपटातील कलाकारांनी ही तगड मानधन घेतले आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच कोट्यावधींची कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com