बॅलिवूडमध्ये कतरिना कैफ एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. कतरिना कैफने अनेक चित्रपटात काम केले आहे. अभिनेत्री कतरिना कैफ नेहमीच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत असते. सोशल मीडियावर ही कतरिनाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. कतरिना नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते.
कतरिना सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या फिटनेस, पोस्टच्या चर्चा रंगत असतात. बॅलिवूडच्या या कैटने आपली लग्नगाठ अभिनेता विकी कौशलसोबत बांधली आहे. या क्यूट कपलचे लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. याबरोबर त्यांच्या एकाकाळी डेट करण्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. या दोघांनी नुकतीत आपली लग्नगाठ ९ डिसेंबर २०२१ वर्षी बांधली होती. याबरोबर त्यांनी हे लग्न करुन चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.
कतरिना आता विकी कौशलच्या घराची सून बनली आहे. याबरोबर या दोघांनी त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांनी सुद्धा त्यांच्या फोटो, व्हिडिओला भरभरुन प्रेम आणि शुभेच्छा दिल्या होत्या. बॅलिवूडमधील या क्यूट कपलला आज चार वर्ष पूर्ण होणार आहे. याबरोबर हे दोघे त्यांचा सुखाचा संसार करताना पाहायला मिळत आहे.
बॅलिवूडची ही अभिनेत्री सध्या काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा शोमध्ये गेली होती. यावेळी कतरिना कैफला अनेक लग्नाबाबतचे प्रश्न विचारण्यात आले होते. या शो दरम्यान कपिलने कतरिनाला एक प्रश्न विचारला होता. कपिलचा तो प्रश्न म्हणजे, तिच्या सासूबाई तिला कोणत्या नावाने हाक मारतात. तर कतरिनाने या प्रश्नांचे उत्तर देताना एक स्पेशल नाव रिव्हिल केले आहे.
कतरिना कैफच्या सासूबाई म्हणजे विकीच्या आई कतरिनाला किट्टो या नावाने हाक मारतात. किट्टो हे पंजाबी नाव आहे. याबरोबर तिने चाहत्यांना सांगितले आहे की, विकीचे आई- बाबा माझी खूप काळजी घेतात. कतरिना कैफला विकीची आई खूप आवडते असे तिने सांगतिले आहे. याबरोबर तिचे असे म्हणणे आहे की, आमचा चांगला बॅान्ड देखील आहे.