Anushka Sharma: दोन मुलांची आई असूनही अनुष्का शर्मा इतकी फिट कशी? वामिका अन् अकायच्या आईचा डाएट प्लान जाणून घ्या

Anushka Sharma Diet: अनुष्का शर्मा बॅालिवूडमध्ये एक टॅाप अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्री अनुष्काने अनेक चित्रपटांत काम केले आहे. त्याचबरोबर अभिनेत्री स्वत:ला फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी काय करते, हे जाणून घेऊयात.
anushka
anushkayandex
Published On

बॅलिवूडची स्टार कलाकार म्हणून ओळखली जाणारी अनुष्का शर्मा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनुष्का शर्मा एक टॅाप अभिनेत्री आहे. अभिनेत्री अनुष्काने तिच्या सुंदर सौंदर्यांचे वेड सर्वांनाच लावले आहे. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट अभिनय करुन सर्व प्रेक्षकांच्या मनावर राज्य देखील केले आहे. अभिनेत्री अनुष्काने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, बॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर अभिनेत्री सोशल मिडियावर खूप चर्चेत पाहायला मिळत असते. अभिनेत्री अनुष्काचे अनेक फिटनेसचे व्हिडिओ सुद्धा सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. पण अभिनेत्री स्वत:ला फिट आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी काय करते, हे जाणून घेऊयात.

anushka
Kriti Sanon Fitness Tips : क्रिती सेनॉनसारखी परफेक्ट फिगर हवीये? फॉलो करा 'हा' डाएट प्लान

अभिनेत्री अनुष्का तिच्या फिटनेसची खूप काळजी घेत असते. अनुष्काला फिट आणि निरोगी राहायला खूप आवडते. अभिनेत्री तिच्या जीवनात वेगवेगळे योगाअभ्यास, जिम वर्कआउटचे प्रशिक्षण घेत असते. त्याचबरोबर या सर्व गोष्टीचे नियमितपणे पालन आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात करत आहे. अभिनेत्री जॅागिंग, चालणे, सायकलिंग यांसारख्या अनेक गोष्टी स्वत:साठी करत आहे.अनुष्का नेहमीच सर्वांना फिट राहण्याचे आवाहन करत आहे. अनुष्का तिच्या फिटनेसमुळे सर्व चाहत्यांना प्रेरित करत आहे. अभिनेत्रीचे म्हणने आहे की, निरोगी शरीरासाठी सर्वांनी आपल्या जीवनात या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. दररोज व्यायाम केल्याने किंवा शरीराला तंदुरुस्त ठेवल्यामुळे आपल्याला कोणतेच आजार होत नाही. शरीरासाठी जसा व्यायाम गरजेचा आहे, तसाच योग्य आहार देखील खूप महत्त्वाचा आहे. म्हणून प्रत्येकांनी आहारात सर्व गोष्टींचा समावेश करावा.

बॅलिवूडची अभिनेत्री अनुष्का तिच्या दिवसाची सुरुवात नारळपाणी किंवा एखाद्या ज्यूसने करते. त्यानंतर अभिनेत्री योगा अभ्यासाचा जास्तीत जास्त व्यायाम करते. अनुष्का जिममध्ये फक्त आठवड्यातून ४ दिवस वजन आणि ताकदीचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात असते. यानंतर अनुष्का नाश्त्यामध्ये उपमा, पोहे आणि उकळलेली अंडी खात असते. अभिनेत्रीच्या आहारात सर्व पोषक घटकांचा समावेश होतो. अभिनेत्री संध्याकाळच्या नाशत्यामध्ये प्रोटीन बार आणि फळांचे सेवन करते. अनुष्का जेवणांमध्ये डाळ, भाजी, चपाती , मासे, कोशिंबीर यांचे सेवन करते. अभिनेत्री रात्रीचे जेवण सातच्या अगोदर करते. अभिनेत्री अनुष्का बाहेरच्या पदार्थांपासून दूर राहते, त्याचबरोबर तिला तळलेले पदार्थ आवडत नाही. अभिनेत्री तिचा काहीसा वेळ ध्यान करण्यासाठी घालवत असते. स्वत:ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी अनुष्का या सर्व गोष्टींबरोबर ८ ते ९ तासांची पुरेशी झोप घेते.

anushka
Wipro Enter in Food Package Market: अंबानी-अदानी आणि टाटाला मिळणार टक्कर, पॅकेज्ड फूड मार्केटमध्ये 'विप्रो'ची एंट्री

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com