Sara Ali Khan: सारा अली खानने ट्रॅफिकवर शोधला रामबाण उपाय, मुंबईच्या लोकल ट्रेनमधील व्हिडीओ शेअर केला

अभिनेत्री सारा अली खानने चक्क ट्रेनमधून प्रवास केला आहे.
sara ali khan new video
sara ali khan new videoSaam Tv
Published On

Sara Ali Khan Traveled in Local Train: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीचं तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. या व्हिडिओच्या माध्यमातून सारा तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ शूटिंगच्या सेटवरील, एखाद्या ट्रिपमधील, जिममधील असतात. पण यावेळी मात्र अभिनेत्रीने एक वेगळंच धाडस केले आहे.

अभिनेत्री सारा अली खानने चक्क ट्रेनमधून प्रवास केला आहे. मुंबईतील ट्रॅफिकचे स्थिती सांगत साराने हा व्हिडिओ शेअर केला आहे. वेळेत पोहचण्यासाठी साराने घेतलेल्या या निर्णयाचे आणि केलेल्या या धाडसाचे कौतुक होत आहे.

sara ali khan new video
Anurag Kashyap: मराठी सिनेमावर अनुराग काश्यपचे वादग्रस्त विधान, म्हणाला मराठी सिनेमा सैराटमुळे...

सारा अली खान एका शूटिंगसाठी जायचे होते. परंतु ट्रॅफिक असल्याने तिने तिच्या कारने न जात ट्रेनने जाण्याचा निर्णय घेतला. साराने तिच्या संपूर्ण टीमसह ट्रेनने प्रवास केला. मुंबईच्या लोकल ट्रेनच्या गर्दीतून प्रवास करत असताना तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिला ट्रेनच्या गर्दीचा काहीही त्रास झालेला नाही. ती या अॅडव्हेंचरचा आनंद घेत आहे. (Sara Ali Khan)

साराने या व्हिडिओमध्ये ती ट्रेनने का प्रवास करत आहे हे कविता करत सांगितले आहे. साराने व्हिडिओमधील कवितेत सांगितले आहे की, ट्रॅफिकमुळे आम्ही हा ट्रेनमधून प्रवास करण्याचा त्रास सहन करत आहोत. कारण 'नो पेन नो गेन'. ट्रेनमधून प्रवास केल्यानंतर ती रिक्षातून प्रवास करणार असल्याचे सुद्धा तिने या व्हिडिओमध्ये सांगितले. तसेच तिने रिक्षामध्ये बसून आम्ही पोचलो असे सुद्धा सांगितले आहे. (Video)

साराच्या या प्रवासात तिच्यासोबत तिची संपूर्ण टीम सुद्धा आहे. तिने तिच्या टीमला सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. तिचे हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट अश्या सगळ्यांचा यात समावेश आहे.

सारा लवकरच आदित्य धर दिग्दर्शित 'द इमॉर्टल अश्वत्थामा' या चित्रपटात अभिनेता विकी कौशलसोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. याशिवाय ती सध्या 'गॅसलाइट'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सारा 'अतरंगी रे' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासह अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील 'हाय चकचक' या गाण्यामुळे सारा खूप कौतुक झाले होते. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com