Anurag Kashyap: मराठी सिनेमावर अनुराग काश्यपचे वादग्रस्त विधान, म्हणाला मराठी सिनेमा सैराटमुळे...

अनुराग कश्यप यांनी प्रादेशिक चित्रपटांविषयी बोलताना सैराटवर भाष्य केले आहे.
Anurag Kashyap On Sairat
Anurag Kashyap On SairatSaam Tv
Published On

Anurag Kashyap On Sairat: चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप याने मराठी चित्रपट सैराटविषयी त्याचे मत व्यक्त केले आहे. चित्रपटांवर आधारित एका कार्यक्रमादरम्यान चित्रपटांच्या ट्रेंडवर भाष्य केले आहे.

प्रादेशिक चित्रपटाचे महत्व सांगताना अनुराग यांनी सैराट आणि कांताराचे उदाहरण दिले आहे. सैराटमुळे मराठी चित्रपट उद्धवस्त झाला, असेही अनुराग म्हणाले आहेत.

Anurag Kashyap On Sairat
Ranbir Kapoor: 'कलाकाराला मर्यादा नसतात…' रणबीरला करायचे आहे 'या' पाकिस्तानी कलाकारासोबत काम

नागराज मंजुळेंच्या सैराट चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीला १०० कोटींचे स्वप्न दाखवलं. मात्र हे स्वप्न मराठी सिनेमासाठी घातक होतं. असे मत सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते अनुराग कश्यप यांनी एका कार्यक्रमामध्ये मांडले आहे. अनुराग यांच्या मते सैराटच्या यशामुळे सगळ्या मराठी निर्मात्यांना सैराट सारखाच सिनेमा करायचा होता आणि त्यामुळे चांगल्या संहितेचे सिनेमे सैराट त्यानंतर मराठीत आले नाही.

अनुराग कश्यप यांनी केलेल्या या विधानाविषयी ते नागराज मंजुळेशी बोलले होते. 'Galatta Plus' मेगा राऊंडटेबल २०२२ या कार्यक्रमादरम्यान अनुराग यांनी हे वक्तव्य केले आहे. सैराट चित्रपटाच्या यशानंतर मराठी चित्रपट निर्माते त्याचे अनुकरण करू लागले आणि त्यामुळे मराठी चित्रपट मागे पडला, असे अनुराग याचे मत आहे. (Progarm)

तसेच अनुराग यांनी बॉलिवूड चित्रपटांचा नाश होत असल्याचेही सांगितले आहे. अनुराग म्हणाले की, "सर्वजण आता पॅन-इंडिया चित्रपट बनवत आहेत. या सर्व चित्रपटांपैकी फक्य ५% किंवा १०% टक्के चित्रपट यशस्वी होतात. ‘कांतारा’ किंवा ‘पुष्पा’सारखा चित्रपट तुम्हाला बाहेर जाऊन तुमची कहाणी सांगण्याचे धाडस देतो, पण ‘KGF 2’ ला कितीही मोठे यश मिळाले तरी तुम्ही प्रयत्न करून, भरमसाठ खर्च करून जेव्हा तसा प्रकल्प उभारता, तेव्हा तो आपत्तीच्या दिशेनं जाऊ लागतो. हा एक बँडवॅगन आहे, ज्याच्या माध्यमातून बॉलिवूडने स्वतःचा नाश केला.'' (Movie)

अनुराग कश्यप यांच्या विधानांचे वेगवेगळे अर्थ काढण्यात येत आहेत. पाहिजं त्यांचे कौतुक करून त्यांना समर्थन देत आहेत. तर काहीजण त्यांच्यावर टीका करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com