

Priyanka Chopra: बॉलिवूडच्या देसी गर्लने आपल्या अभिनयाने बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही नाव कमवले आहे. तिने आता केवळ भारतातच नाही तर परदेशातही आपले नाव कायम ठेवले आहे. ग्लोबल आयकॉन बनलेली प्रियांका चोप्रा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
कधी आपल्या चित्रपटांमुळे तर कधी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांनी चर्चेत असते. देसी गर्ल गेल्या अनेक वर्षांपासून तिचा पती निक, मुलगी मालती आणि कुटुंबीयांसह परदेशात राहत आहे. त्यामुळे भारतातील चाहते तिची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
प्रियांका चोप्रा लवकरच भारतात परतणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमीच म्हणावी लागली. अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जवळपास तीन वर्षांनी भारतात परतल्याची माहिती शेअर केली आहे. यावेळी ती एकटी नाही तर तिची लाडकी मुलगी मालती, प्रियंका चोप्रा आणि निक जोनससोबत येत आहे. ही माहिती शेअर करताना प्रियांका खूपच भावूक दिसली. तिने यूएसए-मुंबई फ्लाइटच्या बोर्डिंग पासचा फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कॅप्शनसह पोस्ट केला आहे
परदेशात भरपूर काळ वास्तव्य केल्यानंतर आपल्या मायदेशी परतल्याच्या भावनेपेक्षा आनंदाची बातमी दुसरे काहीही नाही. अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या खूप आनंदात आहे याचं कारण म्हणजे ती तब्बल तीन वर्षांनी भारतात परतत आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या बोर्डिंग पासचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘शेवटी… घरी जात आहे. जवळपास ३ वर्षांनंतर.’ कोविड महामारीनंतर प्रियांका पहिल्यांदाच भारताला भेट देत असून तिची मुलगीही पहिल्यांदाच भारतात येणार आहे.
प्रियांका अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहते. त्या देशात शिक्षण घेण्यासाठी वयाच्या १२व्या वर्षी अमेरिकेत गेली होती. पण वर्षांतच ती भारतात परतली आणि बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कारकीर्दीनंतर प्रियांकाने 2015 मध्ये 'क्वांटिको'मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. एवढेच नाही तर 2018 मध्ये तिने अमेरिकन गायक आणि संगीतकार निक जोनाससोबत लग्न केले, त्यानंतर ती पूर्णपणे अमेरिकेत शिफ्ट झाली.
Edit By: Chetan Bodke
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.