Priety Zinta: प्रिती झिंटाचे ६ वर्षानंतर चित्रपटसृष्टीत दमदार कमबॅक; चित्रपटाच्या सेटवरील फोटो केला शेअर

Priety Zinta New Movie: नव्वदीच्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे प्रीती झिंटा. प्रिती झिंटा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने नेहमीच जिंकते. प्रिती झिंटा बऱ्याच वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब होती. मात्र, आता प्रिती झिंटा चित्रपटातून पुन्हा एकदा कमबॅक करत आहे.
Priety Zinta
Priety ZintaSaam Tv

नव्वदीच्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे प्रीती झिंटा. प्रिती झिंटा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने नेहमीच जिंकते. प्रिती झिंटा बऱ्याच वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब होती. मात्र, आता प्रिती झिंटा चित्रपटातून पुन्हा एकदा कमबॅक करत आहे.

प्रिती झिंटा गेल्या ६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. प्रिती झिंटा लवकरच 'लाहोर 1947' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रितीने नुकतेच चित्रपटाच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला तिने 'लाहोर 1947'च्या सेटवर असं कॅप्शन दिले आहे. तिने शेअर केलेल्या शेवटच्या फोटोमध्ये सेटवर फोन वापरण्यास मनाई आहे, असं लिहलेलं बॅनर दिसत आहे. या चित्रपटाबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

'लाहोर 1947' चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. राजकुमार संतोष चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. 1947 साली झालेल्या फाळणीवर हा चित्रपट असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात प्रिती झिंटाची भूमिका काय असणार आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच चित्रपटात कोणते कलाकार झळकणार आहे याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

Priety Zinta
Aarti Singh Wedding: गोविंदा-कृष्णा अभिषेकमध्ये पुन्हा खटकलं का? आरती सिंहच्या लग्नाला येण्यावरून काश्मीरा शाह बरंच काही म्हणाली...

प्रिती झिंटाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत झळकली आहे. प्रितीने २०१६ साली जीन गुडइनफशी लग्नगाठ बांधली. या दोघांना दोन मुले असून ते दोघेही लॉल एंजेलिसमध्ये राहते. प्रितीने चित्रपटसृष्टीपासून दूर राहून आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवला आहे. त्यानंतर आता खूप वर्षांनी ती पुन्हा एकदा चित्रपटात दिसणार आहे.

Priety Zinta
Santosh Juvekar: 'आम्ही काय तोडफोड केली आहे...' ; संतोष जुवेकरने 'छावा' चित्रपटाच्या सेटवरील भन्नाट व्हिडिओ केला शेअर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com