Parineeti Chopra Start A New Business: बहिणीच्या पावलावर ठेवलं पाऊल, परिणीती चोप्रा करणार नव्या व्यवसायाला सुरुवात

Parineeti Chopra New Announcement: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच अभिनयासोबतच आणखी एका क्षेत्रातील जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणार आहे.
Parineeti Chopra Start A New Business
Parineeti Chopra Start A New BusinessInstagram
Published On

Parineeti Chopra Announced Jewelry Brand

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्या अभिनयासोबतच आपलं नशीब इतर क्षेत्रात आजमावत आहेत. अशातच आणखी एक अभिनेत्री लवकरच अभिनयासोबतच बिझनेस क्षेत्रातही लवकरच पदार्पण करणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच अभिनयासोबतच आणखी एका क्षेत्रातील जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणार आहे. येत्या काही दिवसांत परिणीती चोप्रा नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे.

Parineeti Chopra Start A New Business
Divya Spandana: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाची अफवा, नेटिझन्सनी सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली

सध्या परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर राघव- परिणीती या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस लग्नगाठ बांधणार आहे. परिणीतीबद्दल बोलायचे तर, ती एक बॉलिवूडमधील सुप्रसिध्द अभिनेत्री असून ती प्रियंका चोप्राची चुलत बहीण आहे. तिने ही आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत प्रसिद्धी मिळवत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर लवकरच एक नवा बिझनेस सुरू करत असल्याची माहिती दिली आहे. सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे.

Parineeti Chopra Start A New Business
Thank You For Coming Trailer: भूमी, शेहनाज, कुशा करणार राडा; गर्ल बॉडिंगवरील बोल्ड चित्रपट 'थँक यू फॉर कमिंग' ट्रेलर रिलीज

परिणीती सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, “गेल्या अनेक वर्षांपासून मला उद्योजिका बनण्याची इच्छा होती. या वर्षी माझे अनेक स्वप्न पूर्ण आहेत, हे पाहून मला खूप आनंद होत आहे. मी माझ्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. मी जेव्हा तृतीया ज्वेलरच्या डिझाईन्स पहिल्यांदा पाहिल्या तेव्हापासूनच मला ब्रँड ॲम्बेसेडरपेक्षा ऐवजी त्यांच्यासोबत काम करण्याची खूप उत्सुकता होती. गुंतवणूकदार आणि भागीदार म्हणून तृतीया ज्वेलर सोबत आल्याने मला खूप आनंद होत आहे. हा व्यवसाय मी कंठी दत्त यांच्याबरोबर मिळून सुरू करत आहे. ८ सप्टेंबर पासून मी नवीन व्यवसायाला सुरुवात करणार आहे.”

Parineeti Chopra Start A New Business
Jawan 1st Day Collection Prediction: शाहरुखचा ‘जवान’ पहिल्या दिवशीच पठान आणि गदर २चा विक्रम मोडणार? ट्रेड ॲनालिस्टचा अंदाज

अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. परिणीतीला चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींकडून नवा बिझनेस सुरु करत असल्यामुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com