khatron ke Khiladi 15 : 'खतरों के खिलाडी १५' मध्ये ग्लॅमरचा तडका, इमरान हाश्मीची हिरोईन झळकणार शोमध्ये?

Mallika Sherawat : 'खतरों के खिलाडी १५' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये इमरान हाश्मीसोबत काम केलेली अभिनेत्री पाहायला मिळणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
Mallika Sherawat
khatron ke Khiladi 15SAAM TV
Published On

'खतरों के खिलाडी' या रिअ‍ॅलिटी शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. या शोमधील स्टंट पाहून डोळे भिरभिरतात. आत या शोचा 15 वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांना या सीझनमध्ये कोण कोण सेलिब्रिटी पाहायला मिळणार हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. आतापर्यंत या धमाकेदार शोचे होस्टिंग रोहित शेट्टीने (Rohit Shetty) केले आहे. मात्र यंदाचे सीझन कोण होस्ट करणार याचा अद्याप खुलासा झाला नाही आहे.

अनेक सेलिब्रिटींना शोसाठी विचारण्यात येत आहे. आता सोशल मीडियावर बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्रीला 'खतरों के खिलाडी 15' साठी (khatron ke Khiladi 15) विचारण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून इमरान हाश्मीची हिरोईन मल्लिका शेरावत (Mallika Sherawat ) आहे. इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावतने अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. यांच्या केमिस्ट्रीचे चाहते दिवाने आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'खतरों के खिलाडी 15'साठी अभिनेत्री मल्लिका शेरावतला विचारण्यात आले आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सध्या सोशल मीडियावर 'खतरों के खिलाडी 15' सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादीत व्हायरल होत आहे. यात कोणाची नावे आहेत , जाणून घेऊयात.

  • एल्विश यादव

  • सिद्धार्थ निगम

  • चुम दरांग

  • अभिषेक मल्हान

  • ईशा सिंह

  • गौतम गुलाटी

  • मनीषा रानी

  • ओरी

  • गुलकी जोशी

  • शगुन पांडे

  • रजत दलाल

  • भाविका शर्मा

मल्लिका शेरावत करिअर

'ख्वाहिश' चित्रपटातून मल्लिका शेरावतने खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मल्लिका शेरावत 'मर्डर' चित्रपटामुळे रातोरात स्टार झाली. 'मर्डर'मध्ये मल्लिका शेरावतने इमरान हाश्मीसोबत काम केले आहे. या चित्रपटात तिने बोल्ड सीन आणि किसिंग सीन केले आहेत. यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. यामध्ये बचके रहना रे बाबा, वेलकम, प्यार के साइड इफेक्ट्स, शादी से पहले यांचा समावेश आहे.

Mallika Sherawat
Chhaava Box Office Collection: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या धामधुमीतही 'छावा'नं मारली बाजी, ६०० कोटींच्या दिशेने यशस्वी घोडदौड सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com