Khatron Ke Khiladi 14 : 'किलर करणवीर' ठरला 'खतरों के खिलाडी 14' चा विजेता, ट्रॉफी मिळावी म्हणून केला होता अनोखा नवस

Karan Veer Mehra : 'खतरों के खिलाडी सीझन 14' चा विजेता करणवीर मेहरा ठरला आहे. अवघ्या तीन महिन्यांनंतर हा शो संपला आहे.
Karan Veer Mehra
Khatron Ke Khiladi 14SAAM TV
Published On

'खतरों के खिलाडी 14' (khatron ke Khiladi 14 ) चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करणवीर मेहरा (Karanveer Mehra) यांने 'खतरों के खिलाडी 14' ट्रॉफीवर आपले नावं लिहिलं आहे. रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) शोचा तो विजेता ठरला आहे. 'खतरों के खिलाडी'च्या ट्रॉफीसोबतच करणवीरला आलिशान कार आणि तब्बल 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

'खतरों के खिलाडी 14' ग्रँड फिनालेमध्ये शालिन भानोत, कृष्णा श्रॉफ, गश्मीर महाजनी, करणवीर मेहरा आणि अभिषेक कुमार हे 5 स्पर्धक होते. करणवीर मेहराच्या पायात मेटल प्लेट असल्यामुळे त्याला 'खतरों के खिलाडी' अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. इलेक्ट्रिक स्टंटच्यावेळी त्याला अनेक जोरदार झटक्यांचा सामना करावा लागला.

एका मिडिया मुलाखतीत बोलताना करणवीर म्हणाल की, तो शो जिंकेल अशी त्याची अजिबात अपेक्षा नव्हती, कारण शो मध्ये असे बरेच स्पर्धक होते जे त्याच्यापेक्षा जास्त चांगले स्टंट करू शकतात. मात्र मी प्रत्येक स्टंट प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न केला. माझा हळूहळू आत्मविश्वास वाढू लागला आणि आज माझ्या हातात 'खतरों के खिलाडी 14' ट्रॉफी आहे.

करणवीरच्या या धाडसी स्वभावासाठी रोहित शेट्टीने त्याचे खूप कौतुक केलं आहे. ग्रँड फिनालेला त्याला 'किलर करणवीर' असे लिहिलेली एक फोटो फ्रेम रोहित शेट्टीने त्याला भेट दिली आहे. करणवीर मेहराला अस्वलाच्या आकाराची ट्रॉफी देण्यात आली. करणवीरने एका मिडिया मुलाखतीत सांगितले की,'खतरों के खिलाडी 14' ची ट्रॉफी जिंकल्यावर तो केसांचे मुंडन करणार असा नवस त्यांनी केला होता. करणवीर मेहराचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या पोस्टमुळे तो नेहमीचं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो.

Karan Veer Mehra
Bigg Boss Marathi : पॅडीदादाची घरातून Exit; 'ती' पोस्ट चर्चेत, 'देवमाणूस' म्हणत नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com