बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नुक्ताच नवरात्रोत्सव सण सुरु झाला आहे. नवरात्रीदरम्यान कतरिनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कतरिनाच्या हातावर डायबिटीज पॅच दिसत आहे. अनेक कलाकार मधुमेहाबद्दल सोशल मीडियावर जागरूकता पसरविण्यात मदत करतात. कलाकारांच्या अशा व्हिडिओंमुळे सामान्य लोकांना या विषयांबद्दल माहिती मिळते.
खरं तर मधुमेह या आजारामुळे रुग्णाच्या आरोग्यावर गंबीर परिणाम होण्याची शक्यता असते. आजकालच्या जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. मधुमेहाच्या रुग्णांना चक्कर येणे आणि वजन वाढणे यासारख्या समस्यांना समोरं जावं लागतं. मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक विशेष प्रकारचं पॅच वापरलं जातं.
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. कतरिनाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये कतरिनाच्या हातावर मधुमेहाचा पॅच लावला आहे. मधुमेहाच्या रुग्णांच्या दंडावर डायबिटीज पॅच लावण्यात येतं. या पॅचमुळे रक्तातील साखरेची पाळी नियंत्रीत राहाण्यास मदत होते. या पॅचमध्ये सूक्ष्म सेन्सर असतात. हे सेन्सर रक्तातील ग्लुकोज मोजत असतात. मधुमेहाच्या रुग्णांना हा पॅच लावण्याचे उद्देष म्हणजे त्यांच्या रक्तातील साखरेचे सतत निरीक्षण करणे आणी मधुमेह व्यवस्थापण अधिक सोयीसकर बनवणे. कतरिनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडालेली पाहायला मिळाली आहे. कतरिना तिच्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी कतरिनाचं वजन वाढल्याच्या चर्चा सुरु होत्या.
नेटकऱ्यांच्या मते, CGM मॉनिटरिंग पॅच लावणं आजकाल नॉर्मल गोष्ट आहे. कतरिनाला मधुमेह झाला आणि त्यामुळे तिने हातावर पॅच लावला आहे असं म्हण्यामध्ये काही अर्थ नाही. तर काही नटकऱ्यांनी कतरिनाने तिच्या रक्तातील साखरेची पातळी मोजण्यासाठी हातावर पॅच लावला आहे असं सांगितले. या व्हायरल झालेल्या व्हिडिओला चाहत्यांकडून अनेक कमेंट्स आले आहेत.
Edited By: Nirmiti Rasal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.