Bollywood Actress attacked : धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, मारहाण केली, सोनं, कॅश लुटली; हैदराबादच्या हॉटेलमधील घटना

Bollywood Actress attacked in Hyderabad: हैदराबादमध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत दरोड्याचा प्रकार समोर आला आहे. अभिनेत्रीने पोलिस तक्रारीत म्हटले आहे की तिला देह विक्री व्यवसायात ढकलण्याची धमकी दिली जात होती.
Bollywood Actress Molest
Bollywood Actress Molestyandex
Published On

Bollywood Actress attacked: हैदराबादमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हैदराबादमध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीला देह विक्री व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तिला लुटण्यात आले. अभिनेत्रीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तिने सांगितले की तिला हैदराबादमध्ये एका दुकानाच्या उद्घाटनासाठी बोलावण्यात आले होते आणि ती जिथे राहत होती तिथे काही अज्ञात लोकांनी घुसून तिच्याकडील पैसे लुटले.

हैदराबादला बोलावून फसवणूक

वृत्तानुसार, मुंबईतील ३० वर्षीय अभिनेत्रीला १७ मार्च रोजी हैदराबाद येथे एका दुकानाच्या उद्घाटन समारंभात पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी तिला एका महिला मैत्रिणीने आमंत्रित केले होते. यासाठी, अभिनेत्रीला तिचे विमान तिकीट आणि कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी काही पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

Bollywood Actress Molest
Avadhoot Gupte: संतोषच्या मदतीला अवधूतची धाव; ट्रोलिंग करणाऱ्यांना सुणावले खडे बोल, म्हणाला, 'हसण्याआधी जरा संतोषच्या...'

अभिनेत्रीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, हॉटेलमधील खोलीत झोपलेली असताना, २-४ महिला आणि तरुणांनी तिच्या खोलीत प्रवेश केला आणि तिला देह विक्री व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला तेव्हा त्यांनी तिचे हातपाय बांधले आणि तिच्या बॅगेतील रोख रक्कम आणि सोने लुटून पळ काढला. अभिनेत्रीने सांगितले की, आरोपींनी तिच्याकडून ५० हजार रुपये लुटले आणि तेथून पळून गेले.

Bollywood Actress Molest
Nikki Tamboli : बिग बॉस फेम निक्की तांबोळीने रागात सोडला 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शो? म्हणाली, 'गौरव खन्नाने आधी माफी...'

या घटनेनंतर, अभिनेत्रीने डायल १०० च्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू झाला. संशयितांची ओळख पटविण्यासाठी पोलिस अधिकारी हॉटेल आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com